अंटार्क्टिका
अंटार्क्टिका  
मुख्य बातम्या

अंटार्क्टिकावर भाजी पिकविण्यात यश

कोजेन्सिस वृत्तसेवा

पृथ्वीच्या एका टोकाला असलेल्या अंटार्क्टिकावर अतिथंड हवामान, बर्फाळ प्रदेश आदी प्रतिकूलतेमुळे कुठलीही वनस्पती उगवू शकत नाही. मात्र, येथील प्रयोगशाळेत लेट्यूस या भाजीसह काकडी, मुळा पिकविण्यात जर्मन संशोधकांना यश आले आहे.

यशस्वी प्रयोगामुळे अंतराळात भाजीपाला पिकविण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे. जर्मनीचे अंटार्क्टिकावर ‘नेऊमायेर स्टेशन ३’ नावाचे संशोधन केंद्र असून, या केंद्रावर कंटेनरच्या आकाराची हरितगृह प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेमध्ये संशोधकांनी ताज्या भाज्या पिकविल्या. अंतराळात भाज्या पिकविण्याच्या उद्देशाने ‘इडेन आयएसएस’ या प्रयोगाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याअंतर्गत या प्रयोगशाळेत भाज्या पिकविण्यात आल्या. या प्रयोगाला मोठे यश मिळाले असून, संशोधकांनी पहिल्या हंगामातच साडेतीन किलो लेटयूस, ७० मुळे आणि १८ काकड्यांचे उत्पादन घेतले. संशोधकांकडून टोमॅटोसह इतर भाज्याही वाढविल्या जात आहेत. येत्या मे महिन्यापर्यंत ही प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन आठवड्याला पाच किलो भाज्या पिकविल्या जाण्याची शक्‍यता आहे. संशोधक बर्नहार्ड ग्रॉप म्हणाले, ‘‘आपल्या घरासमोरच्या बागेतील भाज्यांप्रमाणेच आम्ही अंटार्क्टिकावरील प्रयोगशाळेत पिकविलेल्या भाज्या ताज्या आहेत. त्यासाठी, अंटार्क्टिकावर अंतराळयानासारखेच वातावरण तयार करण्यात आले होते. थोडक्‍यात, कुठलीही जमीन किंवा सूर्यप्रकाश नसलेल्या बंदिस्त वातावरणात या भाज्यांची निर्मिती झाली. आम्ही पाण्यासह प्रकाश आणि कार्बन डायऑक्‍साईडचेही अगदी सूक्ष्म नियोजन केले होते.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Market : आळेफाट्याच्या बाजारात १६५ गायींची विक्री

Urea Racket : युरिया रॅकेटविरोधात अखेर गुन्हा दाखल

Jowar Market : हमीभावापेक्षा कमी दराने विकतेय ज्वारी

Bhavantar Yojana : भावांतर योजनेचे गाजर

Tur Market : विदर्भातील बहुतांश बाजारांत तूरदर दबावात

SCROLL FOR NEXT