The working of Nashik revenue department appreciable-Thorat 
मुख्य बातम्या

नाशिक महसूल विभागाची कामगिरी कौतुकास्पद : थोरात

नाशिक: पुणे येथे दोन दिवसीय महसूल परिषदेत नाशिक विभागाच्या तीन कार्यक्रमांना राज्यभरातून मिळाली कौतुकाची थाप मिळाली आहे. सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, ऑनलाइन ७/१२ या उपक्रमाचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी समारोपप्रसंगी विशेष कौतुक केले.

टीम अॅग्रोवन

नाशिक: पुणे येथे दोन दिवसीय महसूल परिषदेत नाशिक विभागाच्या तीन कार्यक्रमांना राज्यभरातून मिळाली कौतुकाची थाप मिळाली आहे. सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, ऑनलाइन ७/१२ आणि स्वयं बिनशेती चलन वितरण उपक्रम राज्यांत सर्वाधिक लोकाभिमुख ठरले आहेत. या उपक्रमाचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी समारोपप्रसंगी विशेष कौतुक केले. 

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे आयोजित या कार्यक्रमास महसूल व वनविभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, 'यशदा'चे महासंचालक एस.चोक्कलिंगम, जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू, नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर, तसेच नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे  राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. 

परिषदेत नोंदणी व मुद्रांक, घरपोच सातबारा वाटप, ई-पीकपहाणी तसेच नावीन्यपूर्ण उपक्रमाबाबत चर्चा झाली. त्यात महाराजस्व अभियानांतर्गत नाशिक विभागाने राबवलेल्या तीन कार्यक्रमांचे विशेष कौतुक करण्यात आले. बिगर शेतीच्या प्रकरणातही विलंब होऊ नये तसेच जलद निर्णय घेणे शक्य व्हावे म्हणून ही प्रक्रिया पारदर्शक, सुलभ करण्यासाठी  विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे कौतुक करताना लवकरच शासन निर्णय त्याबाबत होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या परिषदेत नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुबियांसाठीच्या ‘उभारी’ उपक्रमांसह नाशिक विभागीय आयुक्त गमे यांनी बिनशेती परवानगीबाबत सादरीकरण केले. नाशिकचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा २०१५ बाबत सादरीकरण केले. जिल्ह्यात या माध्यमातून सुरू असलेल्या सेवेबाबत त्यांनी माहिती दिली.'नाशिक मित्र' वेबसाईटबाबतही त्यांनी सादरीकरण केले.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT