The month-long agitation for Usbila is finally back off
The month-long agitation for Usbila is finally back off 
मुख्य बातम्या

सोलापूर : ऊसबिलासाठी महिन्यापासून सुरू असलेले  आंदोलन अखेरीस मागे 

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या ऊसबिलासाठी तब्बल महिनाभरापासून सुरू असलेल्या तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोलापुरातील काँग्रेस भवनासमोरील आंदोलन बुधवारी (ता.२४) अखेर खात्यावर पैसे जमा केल्यानंतर मागे घेण्यात आले. त्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.  अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री कारखान्याने गेल्या वर्षीच्या ऊसबिलाचे पैसे न दिल्याने तुळजापूर तालुक्यातील शेतकरी अरविंद घोडके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गेल्या महिनाभरापासून काँग्रेस भवनसमोर आंदोलन सुरू केले होते. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, राज्य साखर संघाकडे लेखी तक्रारी केल्या. पण दखल घेतली गेली नाही. या आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आंदोलनस्थळाला भेट देऊन लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले होते. पण पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. माजी आमदार म्हेत्रे हे या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट काँग्रेस भवन समोरच आंदोलन सुरू केले होते. सुरुवातीला काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. पण ते फोल ठरले. कारण शेतकरी ऊसबिल जमा केल्याशिवाय उठायला तयार नव्हते. पण शेवटी अध्यक्ष म्हेत्रे यांनाच यात लक्ष घालावे लागले. या वेळी सुरेश हसापुरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले आदी उपस्थित होते.  साडेअकरा कोटी रुपये जमा  कोणत्याही परिस्थितीत पैसे जमा केल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने पेच निर्माण झाला होता. पण शेवटी कारखान्याला पैसे जमा करावे लागले. त्यानुसार आतापर्यंत ४०० शेतकऱ्यांच्या खात्यावर साडेअकरा कोटी रुपये जमा केले आहेत. त्याची माहिती स्वतः म्हेत्रे यांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिली. तेव्हा आंदोलन मागे घेण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT