Solapur: Review of works under Pilgrimage Development Plan in Pandharpur
Solapur: Review of works under Pilgrimage Development Plan in Pandharpur 
मुख्य बातम्या

पंढरपुरातील तीर्थक्षेत्र विकास आरखड्यातंर्गत कामांचा आढावा 

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तसेच नमामी चंद्रभागा अभियानांतर्गत सुरु असलेल्या व करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला.  तीर्थक्षेत्र विकास आराखडा व नमामी चंद्रभागा अभियानांतर्गत कामांचा आढाव्याबाबत शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीस प्रांताधिकारी गजानन गुरव, अप्पासाहेब समिंदर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, कार्यकारी अभियंता दत्तात्रेय गावडे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, आगार व्यवस्थापक सुधीर सुतार होते.  पालखी बरोबर येणाऱ्या वारकरी, भाविकांना आवश्यक सोयी सुविधा देण्यासाठी भंडीशेगाव, पिराची कुरोली, वाखरी येथील पालखी तळांच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. तसेच आराखड्यातील चंद्रभागा नदीवरील मंजूर घाट बांधणे, पुंडलिक मंदिर, विष्णुपद मंदिर परिसर सुधारण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिल्या.  विविध कामांवर चर्चा...  या बैठकीत पंढरपूर येथे नामदेव स्मारक बांधण्यासाठी जागेची निश्चिती करणे, सोलापूर रस्ता ते शेगाव दुमाला रस्ता भूसंपादन, वेळापूर येथील शेती महामंडळाच्या जागेवर सुलभ शौचालय बांधणे, मंगळवेढा येथील संत चोखामेळा स्मारकाची जागा निश्चित करणे याबाबत आढावा घेण्यात आला. तसेच नमामी चंद्रभागा अभियानांतर्गत समावेश असलेल्या गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणी, देखभाल दुरुस्ती खर्च व त्याबाबतचे तांत्रिक निकष तत्काळ ग्रामपंचायत विभागाने तयार करावेत अशा सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिल्या. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT