Rabbi season crop competition announced
Rabbi season crop competition announced 
मुख्य बातम्या

नाशिक : रब्बी हंगामातील पिकांची पीक स्पर्धा जाहीर 

टीम अॅग्रोवन

नाशिक : शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करून, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य, जिल्हा, विभाग व तालुका पातळीवर पीक स्पर्धांचे आयोजन करण्यासाठीच्या कार्य पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या पीक स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी केले आहे.  रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ या सहा पिकांच्या रब्बी हंगाम पीक स्पर्धेमध्ये समावेश करण्यात आला आहे. पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे संबंधित पिकाखालील किमान १० आर हेक्टर सलग क्षेत्रावर लागवड असणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.  पीक स्पर्धेसाठी तालुका हा घटक निश्‍चित केला असून, ज्या पिकाखालील संबंधित तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र एक हेक्टर किंवा त्याहून अधिक आहे, अशा पिकांकरिता पीक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा सर्वसाधारण व आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान १० स्पर्धक, तर आदिवासी गटातील किमान ५ स्पर्धकांचा सहभाग आवश्यक आहे. भाग घेण्यासाठी ३०० रुपये प्रति शेतकरी, प्रति पीक याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. तालुका पातळीवरील स्पर्धेच्या निकालावरून पुढे जिल्हा, विभाग व राज्य पातळीवरील बक्षिसे जाहीर केली जाणार आहेत.  एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पूर्वी जिल्हा व राज्य पातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा व राज्य पातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते. आता सर्व पातळीवर एकदाच थेट सहभाग घेता येणार असल्याने त्यासाठी एकदाच ३०० रुपये प्रति शेतकरी, प्रति पीक प्रवेश शुल्क भरून पीक कापणी वरून असलेल्या उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार त्याची तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर निवड केली जाणार आहे. पारितोषिकांच्या रकमेमध्ये देखील भरीव वाढ करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.  राज्यांतर्गत विविध पिकांच्या पीक स्पर्धा रब्बी हंगाम २०२१ मध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले अर्ज विहित मुदतीत सादर करण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे व तंत्रअधिकारी गोकूळ अहिरे यांनी केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT