Election in 179 gram panchayats of Raigad district
Election in 179 gram panchayats of Raigad district 
मुख्य बातम्या

रायगड जिल्ह्यातील १७९ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक

टीम अॅग्रोवन

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील रिक्त सदस्यपदांची निवडणूक कोरोनामुळे लांबणीवर पडली होती. अखेर या निवडणुकीला २१ डिसेंबर हा मुहूर्त मिळाला आहे. या दिवशी जिल्ह्यातील १७९ ग्रामपंचायतींच्या २८६ सदस्यांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.  निवडणूक कार्यक्रमानुसार अलिबाग तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींमधील १२, मुरूडमधील आठ ग्रामपंचायतींतील २१, पेणमध्ये १३ ग्रामपंचायतींमधील २१, पनवेलमध्ये ५ ग्रामपंचायतींमधील ९ जागांसाठी निवडणूक होणार आहे. उरणमधील सात सदस्यपदांसाठी, कर्जत १५, खालापूर ५, रोहा १३, सुधागड चार, माणगाव १६, तळा २०, महाड ६७, पोलादपूर २४, श्रीवर्धन ३३, म्हसळा १९ सदस्य पदांची पोटनिवडणूक होणार आहे.  ...असा आहे निवडणूक कार्यक्रम  रिक्त ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेमध्ये नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जाची छाननी ७ डिसेंबरला ११ वाजल्यापासून होणार आहे. अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया ९ डिसेंबरला होणार असून, त्याच दिवशी दुपारी तीननंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदान २१ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान केंद्रांवर होणार आहे; तर मतमोजणी २२ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार यांनी निश्‍चित केलेल्या ठिकाणी होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  प्रशासन सज  रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक जाहीर करण्यात आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर निवडणूक प्रशासकीय प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणुकीचे अर्ज स्वीकारणे, छाननी करणे, अंतिम यादी प्रसिद्ध करणे या प्रक्रिया योग्य पद्धतीने व्हाव्यात यासाठी नियोजन सुरू करण्यात आले आहे. या प्रक्रियेदरम्यान आचारसंहितेचा भंग होणार नाही, याकडे ही लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच मतदान व मतमोजणी शांततेत व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तालुका स्तरावर सूचना करण्यात आल्या आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT