Agriculture Minister's taluka lags behind in distribution of excess rainfall subsidy
Agriculture Minister's taluka lags behind in distribution of excess rainfall subsidy 
मुख्य बातम्या

कृषिमंत्र्यांच्या तालुक्याची अतिवृष्टी अनुदान वाटपात पिछाडी 

टीम अॅग्रोवन

नाशिक: जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी १२० कोटी २४ लाख ७ हजार रुपये निधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचे दिवाळीपूर्वीच देण्याच्या घोषणा झाल्या. मात्र जिल्ह्यात अद्याप १६ टक्के शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झालेले नाही. त्यात कृषिमंत्री दादा भुसे यांचा तालुक्यात २५ टक्के शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (ता.१५) रोजीच्या अनुदान वाटप अहवालानुसार दिसून आले आहे. जिल्ह्यात मालेगाव यामध्ये पिछाडीवर आहे          जिल्ह्यात ९ तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांचे अनुदान तहसीलदार यांच्याकडे वर्ग केला आहे. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दिवाळीला अनुदान खात्यावर वर्ग करण्याची घोषणा झाली. मात्र काही ठिकाणी तांत्रिक अडचणी अडचणीत हे कामकाज सापडले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या(ता.१५) अखेरच्या अनुदान वाटप अहवालात देवळा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात १०० टक्के अनुदान वितरित करण्यात आले आहे. तर पेठ, सुरगाणा तालुक्यात वितरण पूर्ण होण्याच्या जवळपास आहे. येवला, नांदगाव तालुक्यात कामकाज टप्प्याटप्प्याने सुरू आहे. मात्र मालेगाव व निफाड तालुक्याची यात पिछाडी असल्याचे दिसून येत आहे.    जिल्ह्यात सर्वाधिक ४२ कोटी अनुदान मालेगाव तालुक्याला प्राप्त झाले. शेतकऱ्यांना शासनाकडून तालुकास्तरावर प्राप्त झालेली मदत अधिकाऱ्यांनी दिवाळीच्या आत मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून लाखांचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी,अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या. मात्र दिवाळीला १०० टक्के अनुदान बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग न झाल्याने ही घोषणा हवेतच विरली आहे. 

मालेगाव तालुक्यात कामकाजात तांत्रिक अडचणी:  प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही शासनाची भूमिका असून जिल्ह्यातील एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येईल, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितले. मात्र त्यांच्या तालुक्यात अनुदान हे शेतकऱ्यांचे बँक खाते उपलब्ध नसल्यामुळे पडून आहे. अशा वंचित शेतकऱ्यांची यादी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या फलकावर लावण्याचे निर्देशही त्यांनी यापूर्वी दिले. त्याच बरोबर ज्या शेतकऱ्यांचे जिल्हा बँकेत खाते नाहीत अशा शेतकऱ्यांना खाते उघडण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचनाही दिल्या. मात्र यात गती येईल का हे पाहणे अपेक्षित आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT