Agri Scientist Advocates Millets Cultivation
Agri Scientist Advocates Millets Cultivation  
मुख्य बातम्या

कृषी संशोधकांकडून भरडधान्य लागवडीचा आग्रह

टीम अॅग्रोवन

पोषक घटक आणि इतर आरोग्यविषयक गरजा भागवण्यासाठी देशातील जास्तीत जास्त लोकसंख्येच्या आहारात भरडधान्यांचा (Millets) समावेश करण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्रासह राज्यांनीही सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (PDS) भरडधान्यांचा समावेश करण्यात यायला हवा, असा आग्रह ऑल इंडिया पर्ल मिलेट रिसर्च प्रोजेक्ट्च्या (All India Pearl Millet Research Projects) समन्वयक सी. टी. सत्यवती यांनी धरला आहे. 

अनंतपूर जिल्ह्यातील ॲग्रीकल्चरल रिसर्च स्टेशनमधील (Agicultural Research Station) उती संवर्धन केंद्राच्या उद्घाटन समारंभात सत्यवती बोलत होत्या. यावेळी ॲग्रीकल्चरल रिसर्च स्टेशनचे मुख्य संशोधक डॉ. सहदेव रेडडी , पर्ल मिलेट (Pearl Millet)संशोधक चंद्र रेडडी उपस्थित होते.

अनंतपूरच्या संशोधन केंद्रात 'बाजरा' नावाने ओळखल्या जाणाऱ्या फोर्टिफाईड पर्ल मिलेट्सवर (Fortified Peral Millet) संशोधन सुरु आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद आणि  सेंट्रल अरीड झोन रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे येथे १९७२ सालापासून भरडधान्यांवर संशोधन सुरु आहे.

व्हिडीओ पहा-       

सत्यवती या सेंट्रल अरीड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट, जोधपूर येथे कार्यरत असून त्यांच्याच पर्यवेक्षणाखाली देशभरातील कृषी संशोधन केंद्रात भरडधान्यांवर संशोधन सुरु आहे.   

पर्ल मिलेटच्या लागवडीची माहिती देताना सत्यवती यांनी, देशात ११३ लाख हेक्टर क्षेत्रात भरडधान्यांची लागवड केली जाते, त्यातही ७४ लाख हेक्टर क्षेत्रात बाजरा म्हणजेच पर्ल मिलेट्सची लागवड केली जाते. हेक्टरी  १२०० किलो किलोवरून आता उत्पादनक्षमता २०१६ नंतर हेक्टर १३७० किलोवर गेलीय. मिलेट्सचा हमीभावही (MSP) प्रति क्विंटल १३०० रुपयांवरून २२५० रुपयांवर गेलाय. त्यामुळे दुष्काळप्रवण भागातही शेतकरी भरड धान्याचं उत्पादन घेऊन शकतात. किमान खर्चात उत्पादित भरडधान्याला हमीभावाचा लाभ मिळू शकतो, असं म्हटलंय.  

भरडधान्यातील पोषक घटकांची माहिती देताना सत्यवती यांनी, अनंतपूरमध्ये विकसित 'ABV04" या प्रकारच्या बाजऱ्यात आयर्न, झिंक,लिपिड्स आणि फॅटी ऍसिड्स अशा सर्व पोषक घटकांचा समावेश असल्याचं म्हटलं आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब या आजारांनी ग्रस्त नागरिकांनाही हा बाजरा उपयुक्त असल्याचंही त्यांनी नमूद केलंय 

देशभरात त्या-त्या भागात लोकप्रिय पदार्थांत भरडधान्यांचा वापर करणे शक्य असून भरडधान्यांपासून बिस्किट्ससारखे पदार्थ बनवले जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT