संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

दूध संघांना पेमेंट वाटप सुरु

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यातील दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या पेमेंटची प्रतिपूर्ती करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, या योजनेला मुदतवाढ मिळण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. ‘‘शेतकऱ्यांचे कोणतेही पेमेंट महानंदमुळे थांबलेले नाही. उलट हा व्यवहार शेतकरी व दूध संघांमधील आहे. संघांनी ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ गुणप्रतीचे दूध २५ रुपये दराने स्वीकारायचे आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात तसे पेमेंट जमा करून संगणकीय प्रणालीत माहिती भरायची आहे,’’ अशी माहिती ‘महानंद’च्या सूत्रांनी दिली.

तपासणीनंतरच होणार पेमेंट संघांनी भरलेली ही माहिती तपासून घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेले आहेत. गुणप्रतीनुसार शेतकऱ्यांना दर दिला की नाही हे तपासण्याची जबाबदारी जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी किंवा प्रादेशिक दुग्धव्यवसाय अधिकाऱ्यांवर आहे. ‘‘दूध संघांनी शेतकऱ्यांना पेमेंट दिल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी तपासणे सक्तीचे आहे. ही माहिती प्रमाणित केल्यानंतरच महानंद संबंधित संघांना प्रतिपूर्तीच्या स्वरूपात रक्कम देणार आहे. त्यामुळे महासंघांकडून शेतकऱ्यांचे पेमेंट अडविले जाण्याचा मुद्दा उद्भवतच नाही,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

१२७ कोटींना मंजुरी दूध खरेदी व रूपांतरणासाठी २०० कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा राज्य शासनाने केलेली असली तरी प्रत्यक्षात आत्तापर्यंत १२७ कोटी रुपयांना मान्यता दिली आहे. त्यातून महानंदच्या ताब्यात प्रत्यक्षात ५० कोटी रुपये मिळाले आहेत. राज्यात सहा एप्रिल ते २३ एप्रिल या दरम्यान चार कोटी लीटर दूध स्वीकारण्यास व १२७ कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता दिली गेली आहे. मात्र, संबंधित संघांनी शेतकऱ्यांना आधी पेमेंट केल्यानंतर ही रक्कम वाटप केली जाणार आहे,’’ असा निर्वाळा दुग्धविकास खात्याच्या सूत्रांनी दिला.

  २०६३ टन भुकटी तयार दरम्यान, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख म्हणाले की, दूध खरेदी योजनेसाठी निधीची कमतरता नाही. या योजनेतून आत्तापर्यंत २०६३ टन पावडर (भुकटी) व १०८९ टन बटर (लोणी) तयार झालेले आहे. हा माल सुरक्षितपणे गोदामात ठेवला जात आहे. निविदा पद्धतीने तो विक्री केला जाईल.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

Fodder Shortage : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११.८७ लाख टन चाऱ्याची उपलब्धता

PM Narendra Modi : 'मागील ६० वर्षांच्या काळात एससी/एसटी/ओबीसींची सर्वात वाईट अवस्था'; मोदी यांची काँग्रेसवर टीका 

Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT