बुलडाणा येथे आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे.
बुलडाणा येथे आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे. 
मुख्य बातम्या

बुलडाणा जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत पीककर्ज वाटप पूर्ण करा

टीम अॅग्रोवन

बुलडाणा  : यंदा जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे. शेतकरी शेतीची पूर्वमशागत करून खरीप पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. कृषी निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्यासाठी त्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे. हे लक्षात घेत बँकांनी पात्र शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत त्यांच्या उद्दिष्टाच्या जास्तीत जास्त पीक कर्ज वितरण पूर्ण करावे, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित पीककर्ज वितरण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, राजेश एकडे, आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक उत्तम मनवर, जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण आदींसह राष्ट्रीयकृत, व्यापारी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी डॉ. शिंगणे म्हणाले, की महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना प्राधान्याने पीककर्ज वितरण करावे. कर्जमाफी योजनेत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज वितरण करावे. तसेच कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या मात्र अजून यादी न आलेल्या शेतकऱ्यांनाही कर्ज वाटप करण्याबाबत याआधीच शासनाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना बँकांनी पीककर्ज वितरण करावे. पीककर्ज वितरण करताना ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंग, मास्क किंवा रुमाल तोंडावर असणे, सॅनिटायझरचा वापर आदी बाबी कटाक्षाने पाळाव्यात. ग्राम, तालुकास्तरीय समित्यांनी शेतकरी कर्ज घ्यावेत, पीक कर्ज कागदपत्रे आदींबाबत कार्यवाही करावी. शेतकऱ्यांना सहज होईल अशी कार्यपद्धतीचा अवलंब करावा.    २२,६१० शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप बैठकीत जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी पीककर्ज वाटपाबाबतची माहिती दिली. यानुसार ३० मेपर्यंत २२ हजार ६१० शेतकऱ्यांना १७३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरण करण्यात आले. या हंगामात जिल्ह्यातील तीन लाख ६२ हजार ८२८ शेतकऱ्यांना २२६० कोटी रुपये कर्ज वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT