संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पुणे बाजार समितीतील भुसार बाजार सोमवारपासून सुरु होणार

टीम अॅग्रोवन

पुणे  ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेला भुसार विभाग सोमवारपासून (ता.२५) सुरु होणार आहे. काही व्यापाऱ्यांना ‘कोरोना’चा संसर्ग झाल्याने दि पूना मर्चंट्स चेंबरने बाजार बंदचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. २१) जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन येत्या सोमवारपासून (ता. २५) बाजार सुरू करण्याचा आदेश दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत बाजार बंद ठेवता कामा नये, अशा स्पष्ट सूचना गेल्या आठवड्यात दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समितीचे प्रशासक आणि व्यापाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी बैठक घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख, चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, नगरसेवक प्रवीण चोरबेले आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

‘कोरोना’च्या काळात सलग दोन महिने भुसार बाजार नियमित सुरू होता; परंतु व्यापाऱ्यांना ‘कोरोना’ची लागण झाल्याने चेंबरने बाजार बंदचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ‘कोरोना’च्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणखी दोन दिवस बाजार बंद ठेवण्यास परवानगी द्यावी. तसेच शनिवारी कार्यकारिणीची बैठक घेऊन सोमवारपासून बाजार पुन्हा सुरू करू, अशी विनंती यावेळी व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. ही मागणी मान्य करत २५ मेपासून बाजार पुन्हा सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. त्यानुसार विविध खबरदारी आणि उपाययोजना करत बाजार सुरु करत असल्याचे प्रशासक बी.जे देशमुख यांनी सांगितले.

बाजार सुरु करत असताना, गुळ व भुसार विभागाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तर पूरक दुकानांची वेळ दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे. यावेळी केवळ १०० वाहनांना प्रवेश देण्यात येणार असून. प्रत्येकाची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी केली जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

Water Scarcity : नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

Sugar Industry : साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

Summer Sowing : उन्हाळी पेरणी क्षेत्रात नऊ हजार हेक्टरने घट

Maize Production : उत्पादनवाढीसाठी ‘गेमा’ची मका वाढवा मोहीम

SCROLL FOR NEXT