Water Conservation Agrowon
मुख्य बातम्या

राज्यात मृद्‌ व जलसंधारण'ची २३ नवी कार्यालये

राज्यात मृद्‌ व जलसंधारण विभागाची २३ नवी कार्यालये उघडली जाणार आहेत.

टीम ॲग्रोवन

पुणे ः राज्यात मृद्‌ (Soil) व जलसंधारण (Water Conservation) विभागाची २३ नवी कार्यालये उघडली जाणार आहेत. यापैकी पाच जिल्ह्यांमध्ये जलसंधारण अधिकाऱ्यांची स्वतंत्र कार्यालये उघडली जात आहे. मात्र कृषी विभागाने (Department Of Agriculture) मृद्‌ संधारण कामांचा अट्टहास अद्यापही सोडलेला नाही. मृद्‌ व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी अलीकडेच जलसंधारणाच्या प्रशासकीय मनुष्यबळाचा आढावा घेतला. जिल्हा जलसंधारण अधिकारी पदाकरिता रायगड, नंदुरबार, परभणी, हिंगोली, भंडारा या पाच नवी जिल्हा कार्यालये उघडण्यास श्री. गडाख यांनी मान्यता दिली आहे.

याशिवाय १८ ठिकाणी नवी उपविभागीय कार्यालये उघडली जातील. राज्याच्या मृद्‌ व जलसंधारण विभागाच्या आधिपत्याखाली राज्यस्तर यंत्रणेकडे सध्या एकूण २६ जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालये आहेत. तसेच, उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालये १२७ ठिकाणी आहेत. जिल्हा परिषद यंत्रणेकडे एकूण ३१ जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालये तसेच १६८ उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालये कार्यरत आहेत.

नव्या कार्यालयांच्या निर्मितीसाठी लोकप्रतिनिधींकडून सतत पाठपुरावा सुरू होता. ही मागणी पूर्ण होत असल्याने जलसंधारणाची कामे आता वेगाने होणार आहेत. उपविभागीय जलसंधारण कार्यालयासाठी विदर्भात धारणी (जि. अमरावती), बुलडाणा हिंगणघाट (वर्धा), भंडारा याशिवाय चोपडा (जळगाव), इस्लामपूर (सांगली), मोहोळ (सोलापूर), सेलू आणि पाथरी (परभणी), वसमत (हिंगोली), वडसा (गडचिरोली), नेवासा व कोपरगाव (अहमदनगर), सातारा, अलिबाग (रायगड), सावंतवाडी (सिंधुदुर्ग) तसेच देगलूरची (नांदेड) निवड करण्यात आलेली आहे.

दरम्यान, कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की कृषी खात्यातील एक लॉबी जलसंधारणाच्या कामांपासून दूर जाण्यास अजिबात तयार नाही. जलसंधारण विभागाच्या नवी रचना तयार झाल्याने मृद्‌ व जलसंधारणाची कामे ‘कृषी’ने कायमची सोडून दिली पाहिजे. शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी सल्ला देण्यासाठी कृषी खात्यात मनुष्यबळ उपलब्ध नसताना दुसऱ्या खात्याची कामे आपण का करावीत, असा सवाल क्षेत्रिय कर्मचारी उपस्थित करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT