14 agricultural produce markets in the district Winds of elections in committees 
मुख्य बातम्या

नाशिक: जिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार  समित्यांमध्ये निवडणुकांचे वारे 

नाशिक ः जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ता राखण्यासाठी अनेक दिग्गज आपापली राजकीय ताकद वापरत असतात. त्याअनुषंगाने बाजार समित्यांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी राजकारण तापायला सुरुवात झाली आहे.

टीम अॅग्रोवन

नाशिक ः जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ता राखण्यासाठी अनेक दिग्गज आपापली राजकीय ताकद वापरत असतात. त्याअनुषंगाने बाजार समित्यांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या आगामी निवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तर जानेवारी २०२२ मध्ये मतदान होणार आहे. 

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्या सूचनांप्रमाणे जिल्ह्यातील २३ ऑक्टोबरपर्यंत मुदत संपलेल्या १४ बाजार समित्यांची निवडणूक सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जाहीर केली आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाने महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम २०१७ व सुधारित अधिनियम ६ व ७ मधील तरतुदीनुसार ३० सप्टेंबर या अर्हता दिनांकावर तयार केलेल्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, उप/सह निबंधक व बाजार समित्यांचे कार्यालयात प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.यावर दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी २२ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.तर प्रारूप मतदार यादी संबंधित प्राप्त दावे व हरकतींवर निर्णय २२ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान घेतला जाईल.त्यानंतर अंतिम मतदार यादी ६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. 

१६ डिसेंबरपासून निवडणूक कार्यक्रम सुरू 

१६ डिसेंबरपासून नामांकनास सुरुवात होईल.उमेदवारांना ७ जानेवारी २०२२ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.१० जानेवारी रोजी निवडणूक चिन्हांसह अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तर १७ जानेवारी रोजी मतदान होऊन दुसऱ्या दिवशी १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. आगामी निवडणुकीचे वेध लागले असून अनेकांनी तयारी सुरू केली आहे.  बाजार समित्यांच्या होणार निवडणुका  

नाशिक, घोटी, सिन्नर, येवला, दिंडोरी, कळवण,  चांदवड, देवळा, मालेगाव, पिंपळगाव बसवंत, सुरगाणा, मनमाड, लासलगाव, नांदगाव  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT