Vikel te Pikel
Vikel te Pikel 
मुख्य बातम्या

'विकेल ते पिकेल' अंतर्गत १ हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रशिक्षण

टीम ॲग्रोवन

पुणे - राज्य सरकारच्या 'विकेल ते पिकेल' संकल्पने अंतर्गत कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), पुणे आणि मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स, इन्डस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील एक हजार इच्छुक, पात्र शेतकऱ्यांना 'शेतकरी उत्पादक ते कृषि निर्यातदार' (Agri Exporter) विषयक प्रशिक्षणाचे मराठा चेंम्बर ऑफ कॉमर्स, इन्डस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चर (Mahratta Chamber of Commerce, Industries and Agriculture) पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. 

या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांचा वैशिष्ट्यपूर्ण शेतमाल निर्यात केल्याने निश्चितच त्यांना अधिकचा दर मिळून निव्वळ उत्पन्नात भर पडण्यास मदत होणार आहे. प्रत्येक तालुक्यातील ५० निर्यातदार शेतकरी यांचे एक दिवसीय निर्यातदार प्रशिक्षण यानुसार एकूण २० तुकड्यांमध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणासाठी पात्रता -   निर्यातदार युवक हा आत्मा अंतर्गत शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनीचा (Farmer producer Company) सदस्य असावा. प्रशिक्षणार्थीची कमाल वयोमर्यादा ४० वर्षे असावी. त्याचे शिक्षण इयत्ता दहावी उत्तीर्ण असावे. प्रशिक्षाणार्थ्याला इंग्रजी वाचता लिहिता येणे आवश्यक आहे. व्यवसाय करण्याची इच्छा असणारा शेतकरी असावा. शेतकरी (Farmer) निवड निकषानुसार तालुक्याकरिता प्रति गाव एक इच्छुक, पात्र शेतकरी या अनुषंगाने तालुक्यास प्राप्त लक्षांकानुसार शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

व्हिडीओ पाहा - 

निर्यात संधी, (Export Opportunity) ट्रेसेबिलिटी विविध नेट्स, विपणन आणि ब्रँडिंग, निर्यात प्रक्रिया आवश्यक कागदपत्र व प्रमाणीकरण, कृषी निर्यात अर्थ व्यवस्थापन व कृषी निर्यात योजना इत्यादी निर्यातदार प्रशिक्षणातील विषय असणार आहेत. शेतकरी नोंदणी मर्यादित असल्याने प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. प्रशिक्षण (Training) पूर्व नोंदणी आवश्यक असल्याने शेतकऱ्यांनी देण्यात आलेल्या गुगल फॉर्मद्वारे माहिती भरावी आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत पूर्व नोंदणी करुन प्रशिक्षण सत्रात सहभागी व्हावे. तसेच अधिक माहितीसाठी प्रकल्प संचालक, आत्मा, पुणे (०२०-२५५३०४३१) या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशिक्षणाचे ठिकाण व तारीख -

इंदापूर  तालुक्यासाठी ५ जानेवारी २०२२ व  १७ फेब्रुवारी, भोर ६ जानेवारी, जुन्नर १२ जानेवारी व २३ फेब्रुवारी, खेड १३ जानेवारी, पुरंदर १९ जानेवारी व २४ फेब्रुवारी , बारामती २० जानेवारी व २ मार्च, हवेली २७ जानेवारी, शिरुर २८ जानेवारी व ३ मार्च, मुळशी २ फेब्रुवारी, वेल्हा ३ फेब्रुवारी, मावळ ९ फेब्रुवारी व ९ मार्च, आंबेगाव १० फेब्रुवारी, दौंड १६ फेब्रुवारी व १० मार्च २०२२ रोजी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT