Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate Marathwada : मराठवाड्यातील सोयाबीन बाजारात सर्वाधिक दर कुठे मिळतोय?

मागील आठवड्याभरात मराठवाड्यातील अहमदपूर, मानवत आणि उदगीर या बाजारातही सोयाबीन आवक वाढली होती.

Team Agrowon

Soybean Rate: पुणे- राज्यातील सोयाबीन बाजारातील आवक काहीशी कमी झालेली पाहायला मिळाली. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला ब्रेक लावला आहे.

मराठवाड्यातील लातूर, अहमदपूर, उदगीर आणि मानवत सोयाबीन बाजारात दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

मराठवाड्यातील लातूर, अहमदपूर, उदगीर, जालना आणि मानवत बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली आहे. 

मागील दोन महिन्यापासून देशातील बाजारात सोयाबीन दर नरमले आहेत. शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा आहे.

मागच्या आठवड्याभरात राज्यातील लातूर बाजारात सर्वाधिक ३२ हजार ५६० क्विंटल आवक झाली. लातूर बाजार मराठवाड्यातील सोयाबीनचा प्रमुख बाजार आहे. 

मागील आठवड्याभरात मराठवाड्यातील अहमदपूर, मानवत आणि उदगीर या बाजारातही सोयाबीन आवक वाढली होती.

परंतू मागील तीन दिवसांपासून आवक घटली आहे. मराठवाड्यातील काही बाजारात सोयाबीन दरात चढ-उतार सुरू आहेत. 

लातूर बाजारात मागील आठवड्याभरात सोयाबीनची सरासरी दरपातळी ५ हजार ते ५ हजार ३५० च्या दरम्यान राहिली.

तसेच उदगीर बाजारात ५ हजार ते ५ हजार २२५ दरम्यान सोयाबीनची दरपातळी राहिली. मानवत बाजारात मात्र सोयाबीन दर ५ हजार ते ५ हजार १०० च्या दरम्यान राहिले.

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर बाजारातही सोयाबीनचे दर ५ हजार ते ५ हजार २०० च्या दरम्यान स्थिर होते. 

सर्वाधिक दर लक्षात घेता मराठवाड्यतील लातूर बाजारात सोयाबीन सर्वाधिक ५ हजार ३५० रुपये दर मिळाला.

तसेच मानवत बाजारात दोन दिवस ५ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलनेही सोयाबीनचे व्यवहार झाले.

मराठवाड्यातील प्रमुख बाजाराचा विचार करता मागील आठवडाभर सोयाबीन बाजार ५ हजार ते ५ हजार ३०० च्या दरम्यान राहिला.

आंतरराष्ट्रीय पातळीवर पामतेल, सोयापेंड आणि सोयातेल बाजारात सकारात्मक घडामोडीमुळे सोयाबीनला आधार मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा जीआर बेकायदशीर: छगन भुजबळ

Paddy Farming : भातपिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव

Dragon Fruit Plantation: ड्रॅगन फ्रूट लागवडीची योग्य पद्धत कोणती? पीक व्यवस्थापन कसे करावे?

ZP Election : सांगली जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांचे आरक्षणाकडे लक्ष

Food Processing Industry : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत शेतकरी, बचत गटांना संधी

SCROLL FOR NEXT