Wheat MSP Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Wheat MSP : गव्हाच्या ‘एमएसपी’त ११० रुपयांनी वाढ

केंद्र सरकारकडून २१२५ रुपये प्रतिक्विंटल दर निश्‍चित मोहरीसाठी एमएसपी ५४५० रुपये प्रति क्विंटल

टीम ॲग्रोवन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः शेतीमालाचे उत्पादन (Agricultural production) आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने चालू पीक वर्षासाठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) (MSP Rise) ११० रुपयांनी वाढ करून ती २१२५ रुपये प्रति क्विंटल आणि मोहरीच्या एमएसपीमध्ये ४०० रुपयांनी वाढ करून ती ५४५० रुपये प्रति क्विंटल केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारावरील कॅबिनेट समितीच्या (सीसीईओ) बैठकीत एमएसपी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या, सरकार खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामांत घेतलेल्या २३ पिकांसाठी एमएसपी निश्‍चित करते.

खरीप (उन्हाळ) पिकांच्या कापणीनंतर लगेचच ऑक्टोबरमध्ये रब्बी (हिवाळी) पिकांची पेरणी सुरू होते. गहू आणि मोहरी ही प्रमुख रब्बी पिके आहेत. केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार सीसीईएने २०२२-२३ पीक वर्ष (जुलै-जून) आणि २०२३-२४ विपणन हंगामासाठी सहा रब्बी पिकांसाठी एमएसपीमध्ये वाढ करण्यास मान्यता दिली.

२०२१-२२ पीक वर्षातील २०१५ रुपये प्रति क्विंटलवरून या पीक वर्षासाठी गव्हाची एमएसपी ११० रुपयांनी वाढवून २१२५ रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. यासाठी गव्हाचा उत्पादन खर्च १०६५ रुपये प्रति क्विंटल गृहीत धरण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT