Tur  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : तुरीचे भाव नेमकं कशामुळे कमी होत आहेत?

Market Update : सध्या तुरीला सरासरी ८ हजार ते ९ हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय. आवक वाढल्यानंतर बाजारावरील दबाव वाढू शकतो.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा दिसून आली. पण सोयापेंड दबावातच आहे. सीबाॅटवर सोयाबीनचे वायदे काहीसे वाढून १३.१७ डाॅलरवर पोचले होते. अमेरिकेच्या सोयाबीनला मागील दोन आठवड्यांमध्ये चांगला उठाव मिळाल्याने सीबाॅटवर सुधारणा दिसली.

पण सोयापेंड ३९३ डाॅलरवरच होते. देशातील बाजारत मात्र सोयाबीन दबावातच आहे. सोयाबीनला ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. देशातील बाजारावर सध्या आंतरराष्ट्रीय बाजाराचा दबाव असल्याचे अभ्यासक सांगतात.

कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे. कापसाचा हंगाम सुरु होऊन ३ महिने होत आहेत. तरीही कापसाच्या भावात सुधारणा नाही. कापसाची बाजारातील आवक कायम आहे. पुढे सुताला आणि कापडाला उठाव सध्या मर्यादीत आहे. उठाव वाढण्यासाठी अनुकूल घटक पुढे येत आहेत. पण अपेक्षित उठाव नसल्याने कापसाला मागणी स्थिर आहे.

त्यातच सध्याच्या भावात गरेजेप्रमाणे कापूस मिळत असल्याने दर स्थिरावल्याचे अभ्यासक सांगतात. कापसाचा भाव आजही ६ हजार ६०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ७९.७१ सेंटच्या दरम्यान होते. तर देशातील वायदे ५५ हजार ८०० रुपयांवर होते. कापसाचा हा भाव आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज आहे.

टोमॅटो बाजारातील नरमाई वाढली आहे. महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांमधील टोमॅटो आवक वाढली आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. टोमॅटोचा बाजार मागील तीन आठवड्यांमध्ये क्विंटलमागं ५०० ते ८०० रुपयांनी कमी झाले. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ५०० ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत.

बाजारातील टोमॅटो आवक आणखी काही दिवस या पातळीदरम्यान राहू शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे आणखी काही दिवस टोमॅटो बाजारावरील दबावही कायम दिसू शकतो, असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत.

तुरीच्या भावातील नरमाई सुरुच आहे. तुरीच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये क्विंटलमागं जवळपास एक हजार रुपयांची नरमाई आली. याचे मुख्य कारण आहे नव्या मालाची आवक. देशातील अनेक बाजारात नवी तूर दाखल होत आहे. पुढील काळात आवक वाढेल. तसेच सरकारच्या धोरणांचाही दबाव आहे.

सध्या तुरीला सरासरी ८ हजार ते ९ हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय. आवक वाढल्यानंतर बाजारावरील दबाव वाढू शकतो. पण यंदा देशातील उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तसेच आयात वाढीला मर्यादा आहेत. त्यामुळे आवक घटल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील मका उत्पादन यंदा घटले आहे. त्यातच पशुखाद्य उद्योग आणि इतर वापरासाठी मक्याला बऱ्यापैकी उठाव आहे. त्यामुळे मक्याचे भाव टिकून आहेत. सध्या बाजारात मक्याल प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. देशात यंदा इथेनाॅलसाठी मक्याचा वापर वाढण्याची शक्यता आहे.

याचा आधार बाजाराला मिळू शकतो. सध्या देशातील मक्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे निर्यात मोठ्या प्रमाणात कमी झाली. पण देशातच उठाव असल्याने मक्याचा बाजार टिकून राहू शकतो, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT