Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Procurement : अग्रवालच्या वृंदावन जिनिंगमधील धर्मकाट्यात फिक्सिंग

Cotton Market : कापसाला कमी भाव असल्याने बाजार समितीच्या माध्यमातून निवडलेल्या जिनिंगवर शेतकरी कापूस हमीभावानुसार विक्री करतात. अशात सोमवारी कापूस घेउन गेलेल्या शेतकऱ्याने कापसाची मोजणी केली.

संदीप रायपुरे

Chandrapur News : कापसाला कमी भाव असल्याने बाजार समितीच्या माध्यमातून निवडलेल्या जिनिंगवर शेतकरी कापूस हमीभावानुसार विक्री करतात. अशात सोमवारी कापूस घेउन गेलेल्या शेतकऱ्याने कापसाची मोजणी केली. या दरम्यान धर्मकाट्यात फिक्सिंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला.

तब्बल एक क्विंटल साठ किलो कापूस कमी भरला. दुसऱ्याही शेतकऱ्याबाबत असेच घडले. या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नवेगाव वाघाडे येथील अग्रवाल यांच्या वृदांवन जिनिंगमध्ये हल्लाबोल करत एल्गार पुकारला. संतप्त हजारो शेतकऱ्यांनी अहेरी नागपूर हा महामार्ग अडवल्याने वाहतुकीची कोंडी झाली.

कापसाला कमी भाव असल्याने शेतकरी बांधव आधीच अडचणीत आला आहे. अशात आता जिनिंगचालकच शेतकरी बांधवांची फसवणूक करत असल्याचा संतापदायक प्रकार सोमवारी समोर आला.

चंद्रपूर जिल्ह्यातील भिमणी या गावातील निळकंठ गिरसावळे व प्रदीप पिंपळशेंडे या शेतकऱ्यांनी नवेगाव येथील अग्रवाल यांच्या वृदांवन जिनिंगमध्ये कापूस विक्रीसाठी आणला होता. त्यांनी जिनिंगच्या धर्मकाट्यावर मोजणी केली.

त्यांना संशय आल्याने त्यांनी बाहेरील धर्मकाट्यावर मालाची मोजणी केली. यात एक क्विंटल साठ किलो मालाची तफावत आढळली. दुसऱ्या शेतकऱ्याबाबत असाच प्रकार घडला. त्यांच्या मोजमापातही ६५ किलोची तफावत आढळली. हा प्रकार लक्षात येताच शेतकरी संतापले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Compensation Maharashtra : राज्यात ५ लाख एकर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

Kiwi Fruit Benefits: रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे किवी

Sugarcane Worker Registration: बीड जिल्ह्यात ५८४५ ऊसतोड कामगारांची नोंदणी पूर्ण

Rain Mango Damage: पूर्वमोसमीचा तडाखा; आंब्यासह भाज्या मातीमोल

SCROLL FOR NEXT