Rice Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Rice Export : विदर्भातील तांदूळ निर्यात पोहोचली बारा लाख क्विंटलवर

Federation of Vidarbha Rice Industry Association : एकट्या विदर्भातील निर्यात बारा लाख क्विंटल आहे. त्यामुळेच यंदाच्या हंगामात तांदळाचे दर हमीभाव २३०० रुपयांपेक्षा अधिक राहतील, असा विश्‍वास फेडरेशन ऑफ विदर्भ राइस इंडस्ट्री असोसिएशनने व्यक्‍त केला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Gondiya News : केंद्र सरकारने धानावरील निर्यात शुल्क हटविल्याने पॅराबॉइल्ड तांदळाच्या निर्यातीला चालना मिळणार आहे. एकट्या विदर्भातील निर्यात बारा लाख क्विंटल आहे. त्यामुळेच यंदाच्या हंगामात तांदळाचे दर हमीभाव २३०० रुपयांपेक्षा अधिक राहतील, असा विश्‍वास फेडरेशन ऑफ विदर्भ राइस इंडस्ट्री असोसिएशनने व्यक्‍त केला आहे.

पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांच्या बहुतांश क्षेत्रात तर नागपूरच्या काही भागांत धानाची लागवड होते. गोंदियाला त्यामुळेच ‘राइस सिटी’ तर भंडारा हे ‘धानाचे कोठार’ म्हणून ओळखले जाते. परंतु केंद्र शासनाने पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर लादलेली बंदी आणि पॅराबॉइल्ड तांदळाच्या निर्यातीवर २० टक्‍के आयात शुल्क लावले होते. त्यामुळे विदर्भातून होणारी तांदळाची निर्यात प्रभावित झाली.

त्याचा दरावरही परिणाम झाला. खासगी प्रक्रिया उद्योजकांनी अपेक्षित दर दिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाला हमीभावानेच धानविक्री केली. केंद्राने निर्यातीला प्रोत्साहन देणारी धोरण राबविल्याने यंदाच्या खरिपात परिस्थिती वेगळी असेल, असा दावा प्रक्रिया उद्योजकांकडून केला जात आहे. पॅराबाइल्ड राइसवर २० टक्‍के आयात शुल्क आकारले जात होते ते आता हटविण्याले आहे. पांढऱ्या तांदळाची निर्यात खुली केली आहे. त्याचा परिणाम दरावर होईल, असे फेडरेशन ऑफ विदर्भ राइस इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल यांनी सांगितले.

काय आहे पॅराबॉइल राइस?

कमी कालावधीचे (९० दिवस) हे वाण आहे. याची ५० क्‍विंटल हेक्‍टरी उत्पादकता मिळते. शिजविल्यानंतर वाळवत घालून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर हा तांदूळ खाऱ्या पाण्यातही शिजवून खाता येतो. आपल्याकडील व्हाइट राइस हा कच्चा तांदूळ मानला जातो. १२० ते १३० दिवस याचा परिपक्‍वता कालावधी आहे. याची उत्पादकता पॅराबाइल राइसच्या तुलनेत हेक्‍टरी ३० क्‍विंटल इतकीच राहते. यंदा पाऊस चांगला झाल्याने खरिपातील तांदळाची प्रत आणि उत्पादकता समाधानकारक असल्याचे अशोक अग्रवाल यांनी सांगितले.

विदर्भातून पॅराबॉइल्ड राइसची ११ ते १२ लाख टन निर्यात होते. एकट्या गोंदिया जिल्ह्यातून पाच लाख टन निर्यात दर वर्षी होते. त्यामुळेच २३०० रुपयांचा हमीभाव धानाला असताना यंदा २३५० ते २४०० रुपये असा खरेदी दर बाजारात राहील, अशी शक्‍यता आहे. १५ नोव्हेंबरनंतर खरीप धानाची बाजारातील आवक वाढणार आहे.
अशोक अग्रवाल, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ विदर्भ राइस इंडस्ट्री असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT