Market vegetable Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Vegetable Market Rate : टोमॅटो, मिरचीच्या दरात दुप्पटीने वाढ, पाणी टंचाईने फळभाज्या वाळण्याचा धोका

Monsoon Rain Update : जून संपत आला तरी राज्यात मान्सूनचे आगमन न झाल्याने पाणी टंचाई भासू लागली आहे. अशातच तापमान वाढ आणि उष्णतेचा फटका पालेभाज्यांसह फळभाज्यांवर होत आहे.

Team Agrowon

Pune News : जून संपत आला तरी राज्यात मान्सूनचे आगमन न झाल्याने पाणी टंचाई भासू लागली आहे. अशातच तापमान वाढ आणि उष्णतेचा फटका पालेभाज्यांसह फळभाज्यांवर होत आहे. यामुळे भाज्यांचे दर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पिंपरी आणि पुण्यात किरकोळ विक्री होत असलेल्या टोमॅटो आणि मिरचीच्या दरात वाढ झाली आहे.

इतर भाज्यांच्या तुलनेत टोमॅटोचे भाव वाढले आहेत, मागच्या ८ दिवसांपूर्वी ३० रुपये किलोने विकला जाणार टोमॅटो ४० ते ४५ रुपये किलो दराने विकला जात आहे. तसेच कोथंबिर, पालक आणि मेथीच्या जुडीची तीस ते चाळीस रुपये दराने विक्री होत आहे. हिरव्या मिरचीचे दर प्रतिकिलो १०० वर गेले आहेत.

मागच्या काही महिन्यात टोमॅटोचा भाव पडल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी निराशा झाली होती. १० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. पाण्याअभावी पालेभाज्या आणि पीके वाळून जात असल्याने मोठे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.

पुण्यातील २५ पैकी १८ धरणांनी तळ गाठल्याने उपसाबंदीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. पाण्याअभावी पालेभाज्यांची नासाडी होत आहे. यामुळे भाजीपाला आणि फळभाज्या बाजारात कमी प्रमाणात आल्याने दर वाढत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी उपबाजारात कांद्याची आवक ५३५ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे तर बटाट्याची ११९१ क्विंटल आल्याचे बाजारसमितीमार्फत माहिती देण्यात आली.

टोमॅटो ४०४ क्विंटल, मटार १४ क्विंटल एवढी आवक झाली आहे. मोशी उपबाजारात पालेभाज्या एकुण २६७०० पेंड्या, सफरचंद, मोसंबी, यासह अन्य फळे ३६० क्विंटल आणि फळभाज्यांची आवक ३४९६ क्विंटल एवढी झाली आहे.

पालेभांज्याच्या दरात किरकोळ वाढ

मेथी ३०, कोथिंबीर ४०, कांदापात २५, शेपु २५, पुदिना १५, मुळा २०, पालक ३०

फळभाज्यांचे प्रतिकिलोचे भाव

कांदा २०, बटाटा ३०, लसूण १००, आले १००, मटार ९०, भेंडी ६०, टोमॅटो ४० ते ४५, देशी आणि जवारी गवार १००, दोडका ४०, दुधी भोपळा ५०, लाल भोपळा ५० ते ६०, कारली ४०, वांगी ४०, भरीताची वांगी ५०, तोंडली ५०, पडवळ ४०, फ्लॉवर ५०, कोबी ३०, बिन्स १००, बीट ५०, आवळा ६०, राजमा ५०, काकडी ४०, शिमला ६०, शेवगा ९० असा दर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmers Support: कांद्याच्या भावात घसरण, उपाययोजनांसाठी सरकारकडून समिती गठित

Crop Damage Nashik: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७३ कोटींच्या निधीचा प्रस्ताव

Fertilizer Overprising: सोलापूर जिल्ह्यातील १९ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

Assembly Elections 2026: पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी ९१.४६ टक्के, तामिळनाडूत ८४.४१ टक्के मतदान

Crop Insurance Hingoli: हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचा ९८ कोटी ७० लाख रुपये पिकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT