Urad Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Urad Market : खानदेशात उडीद आवक सुरू

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात बाजार समित्या किंवा बाजारात नव्या हंगामातील उडदाची आवक सुरू झाली असून, दर प्रतिक्विंटल ८३०० ते ९२०० रुपये प्रतिक्विंटल व सरासरी ८८०० रुपये असा मिळत आहे.

आवक मागील चार ते पाच दिवसांतच सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी पावसापूर्वी उडदाची कापणी केली. त्या वेळेस पाऊस नसल्याने त्याची मळणीदेखील झाली. हा उडीद बाजारात येत आहे.

खानदेशात जळगावमधील जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबारमधील नंदुरबार व शहादा या बाजार समित्यांत उडदाची आवक सुरू झाली आहे. चोपडा येथील बाजार समितीत मागील चार दिवसांत प्रतिदिन सरासरी ५५ क्विंटल उडदाची आवक झाली आहे. दर प्रतिक्विंटल ८३०० ते ९२०० रुपये प्रतिक्विंटल, असा मिळाला.

जळगाव येथील बाजार समितीतही कमाल दर ९२०० रुपयांपेक्षा अधिक नसल्याची माहिती मिळाली. जळगाव जिल्ह्यात रोज प्रमुख बाजार समित्यांत २५० क्विंटल उडदाची आवक होत आहे. उडदाचा दर्जा बऱ्यापैकी आहे. कारण अतिपावसाचा फटका पिकाला बसलेला नाही. काळ्या कसदार जमिनीत कमी पावसातही पिकाची स्थिती बरी होती.

तापी, गिरणा, पांझरा, अनेर नदीच्या क्षेत्रात उडदाची पेरणी बऱ्यापैकी झाली होती. याच भागातून आवक होत आहे. धुळ्यात आवक कमी आहे. नंदुरबार जिल्ह्यातही आवक कमी आहे. कारण नंदुरबारात कमी पावसात नंदुरबार, नवापूर भागात उडदाचे नुकसान झाले. जूनमध्ये पाऊस नसल्याने अनेकांनी उडीद पेरणी टाळली.

यामुळे या भागात आवक कमी आहे. जळगाव जिल्ह्यात अमळनेर, चोपडा व जळगाव बाजार समित्यांच्या क्षेत्रात पेरणी अधिक झाली होती. याच भागात आवकही सुरू झाली आहे. मागील आठवड्यात पाऊस झाल्याने अनेकांची उडीद कापणी, मळणी रखडली आहे. यामुळे आवक पुढील काही दिवस स्थिर राहील. परंतु वातावरण कोरडे, सूर्यप्रकाशित राहिल्यास आवक पुढील आठवड्यात वाढेल, असाही अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT