Yellow Pea Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Yellow Pea Import : पिवळा वाटाणा आयात बेलगाम मुक्त आयातीला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Market Impact : देशात डाळिंचे भाव कमी करण्यासाठी सरकारने सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत पिवळ्या वाटाण्याची आयात खुली केली होती. आता वाटाण्याच्या खुल्या आयातीला २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Anil Jadhao 

Pune News : देशात डाळिंचे भाव कमी करण्यासाठी सरकारने सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत पिवळ्या वाटाण्याची आयात खुली केली होती. आता वाटाण्याच्या खुल्या आयातीला २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. वाटाणा आयातीवर शुल्कसह कोणतेही बंधन नाही. त्यामुळे आतापर्यंत २४ लाख टनांची आयात झाली. याचा हरभरा, तूर, मसूरच्या भावावर परिणाम झाला आहे.

देशात २०२३ मध्ये कडधान्याचे उत्पादन कमी झाले होते. तूर, हरभरा, मसूरचे उत्पादन कमी झाल्याने देशात भाव वाढले होते. वाढलेले भाव कमी करण्यासाठी सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये पिवळा वाटाणा आयात खुली केली होती. आयात शुल्क किंवा कुठलीही बंधने ठेवण्यात आली नाहीत.

ही मुक्त आयात मार्च २०२४ पर्यंत राहील, असे त्यावेळी म्हटले होते. पण नंतर मुक्त आयातीला मदतवाढ देत आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदत होती. मात्र मुदत संपण्याआधीच सरकारने पुन्हा दोन महिन्यांनी मुदत वाढवली. सरकारने २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पिवळा वाटाणा आयात मुक्त केली आहे.

सरकारने पिवळा वाटाणा आयात खुली केल्यानंतर देशात मोठी आयात झाली. गेल्या ११ महिन्यांमध्येच विक्रमी आयात झाल्याची माहिती आयातीच्या आकडेवारीतून पुढे आली. डिसेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२४ या ११ महिन्यांमध्ये देशात तब्बल २४ लाख टन पिवळा वाटाणा आयात झाली होती. डिसेंबरचा आयातीचा आकडा जानेवारी महिन्यात पुढे येईल. पण जेवढी आयात झाली तेवढी आतापर्यंत कोणत्याही वर्षात झाली.

हरभरा, तुरीवर परिणाम

पिवळा वाटाणा सवळपास सर्वच डाळींना पर्याय म्हणून वापरला जातो. त्यातही सर्वाधिक पर्याय हरभऱ्याला ठरतो. त्यानंतर तुरीलाही जवळपा ३० टक्के पर्याय ठरतो. नेमके हीच दोन पिके महत्वाची कडधान्य पिके आहेत. देशात पिवळा वाटाणा आयात वाढल्यानंतर तुरीच्या भावातील तेजी थांबली होती. नंतर भाव कमी देखील झाले होते. तर हरभऱ्यातील तेजीही पिवळ्या वाटाण्यामुळे थांबली.

आयातीचा लोंढा

देशात कडधान्य उत्पादन कमी होऊन भाव वाढल्यानंतर सरकार शेवटचा उपाय म्हणून पिवळा वाटाणा आयात खुली करते, हा अनुभव यापुर्वी देखील आला आहे. २०१६-१७ मध्ये देशातील उत्पादन कमी झाल्यानंतर देशात ३१ लाख टन पिवळा वाटाणा आयात झाली होती. तर यंदा आतापर्यंत २४ लाख टन आयात झाली. त्यापैकी ८ लाख टनांचा स्टाॅक सध्या देशात उपलब्ध आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT