Cotton Market
Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : ‘स्मार्ट’अंतर्गत कापसापासून रुई निर्मिती प्रक्रियेस सुरुवात

Team Agrowon

परभणी ः स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत (SMART Project) राज्यातील प्रमुख कापूस उत्पादक (Cotton Producer) असलेल्या परभणी जिल्ह्यातील चार तालुक्यांत स्मार्ट कॉटन (Smart Cotton) हा उपप्रकल्प राबविला जात आहे. या अंतर्गत शनिवारी (ता. ७) डिग्रस जा.(ता. सेलू) येथील नानाई फार्मर प्रोड्यूसर्स कंपनी अंतर्गतच्या शेतकऱ्यांच्या उच्च दर्जाच्या कापसापासून रुई तयार करण्याच्या प्रक्रियेस पाथरी येथील जिनिंग कारखान्यामध्ये सुरुवात करण्यात आली.

शेतकरी स्वतः ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर रुईच्या गाठीची विक्री करणार आहेत. जागतिक बाजारपेठेत परभणी जिल्ह्यातील कापसाच्या ब्रॅण्डची ओळख होईल. कापूस मूल्य साखळी प्रक्रिया सुरू करणारी मराठवाड्यातील ही पहिलीच शेतकरी उत्पादक कंपनी आहे, अशी माहिती स्मार्ट प्रकल्पाचे परभणी जिल्हा नोडल अधिकारी बी. एस. कच्छवे यांनी दिली.

जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ आणि कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या मार्फत स्मार्ट प्रकल्पाचे राज्य नोडल अधिकारी दशरथ तांभाळे, स्मार्ट कॉटन प्रकल्पाचे राज्य नोडल अधिकारी जयेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट कॉटन उपप्रकल्पांची अंमलबजावणी केली जात आहे. यात लहान, सीमांत शेतकरी केंद्रस्थानी आहे.

शेतीमालाच्या सर्वसमावेशक स्पर्धात्मक मूल्य साखळीच्या विकासासाठी परभणी जिल्ह्यातील सेलू, पाथरी, गंगाखेड, पालम या चार तालुक्यांमध्ये हा प्रकल्प २०२१ ते २०२६-२७ या सात वर्षांकरिता राबविला जात आहे.

गंगाखेड येथील महेश कॉटस्पिन जिनिंग फॅक्टरी आणि पाथरी येथील नितीन जिनिंग फॅक्टरी या दोन जिनिंग कारखान्याच्या परिसरातील १५ किलोमीटर परिघातील चार तालुक्यांतील प्रत्येकी ५ असे मिळून २० गावांतील प्रत्येकी एक मिळून २० शेतकरी गट यात सहभागी झाले आहेत.

यंदा (२०२२-२३) एकूण ६०० एकरांवर एकजिनसी कापसाची लागवड करण्यात आली आहे. कापसाची मूल्यसाखळी विकसित केली जात आहे. त्याअनुषंगाने कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी चवळी, बाजरी आदी सापळा पिकांचे बियाणे कामगंध सापळे (फेरोमेन ट्रॅप) आदी साहित्यांसह निविष्ठांचा पुरवठा करण्यात आला. या प्रकल्पात सहभागी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या एकजिनसी कापसाची थेट विक्री न करता त्याचे रुई गाठीत रूपांतरित केले जाणार आहे. या गाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्री केला जाणार आहे, असे कच्छवे म्हणाले.

पुढील हंगामासाठी या मध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वागत आहे. जिनिंग प्रेसिंगची सोय असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांना यामध्ये सहभागी होता येईल. सहभागी शेतकरी, शेतकरी गटांना एकजिनसी एकाच वाणाची निवड करण्याचा अधिकार आहे.

- बी. एस. कच्छवे, जिल्हा नोडल अधिकारी स्मार्ट

प्रकल्प, परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT