Turmeric  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Harvesting: हळद काढणी सुरू; पंधरा दिवसांत गती येणार

Turmeric Market: सांगली आणि सातारा जिल्ह्यांत हळद काढणी सुरू झाली आहे. सध्या येथील बाजार समितीत नव्या हळदीची आवक सुरू झाली आहे. हंगामाच्या प्रारंभी हळदीला सरासरी १५,३०० हजार ते १६,४०० हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News: सांगली आणि सातारा जिल्ह्यांत हळद काढणी सुरू झाली आहे. सध्या येथील बाजार समितीत नव्या हळदीची आवक सुरू झाली आहे. हंगामाच्या प्रारंभी हळदीला सरासरी १५,३०० हजार ते १६,४०० हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांत हळदीचे प्रति क्विंटल तीनशे रुपयांनी दर वाढले आहेत.

देशात २ लाख ७० हजार हेक्टरवर हळदीची लागवड झाली आहे. जून ते ऑक्टोबरअखेर पावसाचा आणि रोगाच्या प्रादुर्भावाचा फटका हळद पिकाला बसला. त्यातूनही निसर्गाच्या संकटातूनही शेतकऱ्यांनी हळदीचे पीक चांगले साधले आहे. अति पाऊस आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे हळदीचे उत्पादन पंधरा टक्क्यांनी घटणार आहे. सध्या सांगली आणि सातारा या दोन जिल्ह्यांतील हळद काढणीचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले आहे.

हळदीची मागणी असल्याने उठावही होत आहे. हंगामाच्या प्रारंभीच हळदीला सरासरी १५,३०० हजार ते १६,४०० हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. सध्या हळद काढणी सुरू असली तरी, काढणीला गती आली नाही. त्यामुळे बाजारात हळदीची आवक जेमतेमच आहे. येत्या आठवड्यापासून हळद काढणीला गती येईल. त्यानंतर अर्थातच पंधरा दिवसांनी हळदीची आवक वाढणार आहे.

दरम्यान, विदर्भ, मराठवाड्यासह तेलंगण, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओरिसा या राज्यांतील हळद काढणी फेब्रुवारी अखेरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे या बाजारपेठांत मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून हळद विक्रीस येण्याचा अंदाज हळद व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दर टिकून राहण्याची शक्यता

प्रतवारीनुसार हळदीचे दर (प्रति क्विंटलमध्ये)

प्रत १ (अंगठी) १६१०० ते १६९००

प्रत २ १४३०० ते १४८००

गड्डा ११८०० ते १२८००

कणी १३३०० ते १४०००

यंदाच्या हंगामात हळद विक्रीस येऊ लागली आहे. हंगामाच्या सुरुवातीला दर चांगले असून येत्या पंधरा दिवसांत हळदीची आवक वाढेल.
गोपाळ मर्दा, हळद व्यापारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

Paddy Sowing: भात पेरणीची घाई करू नका

Palghar Rain Update: पावसाच्या प्रतीक्षेला अखेर विराम

Tur MSP Procurement: शेतकऱ्यांकडून तुरीची हमीभावापेक्षा कमी दरात खुल्या बाजारात विक्री?; पणनमंत्र्यांकडून महत्त्वाचा खुलासा

SCROLL FOR NEXT