Tur Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market : अकोल्यात तुरीच्या दराची १० हजारांकडे झेप

Tur Market Update : तुरीचा दर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १० हजार रुपयांकडे निघाला आहे. शनिवारी (ता.१५) तुरीचा कमाल दर १० हजार २०५ रुपये एवढा होता.

Team Agrowon

Akola News : तुरीचा दर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १० हजार रुपयांकडे निघाला आहे. शनिवारी (ता.१५) तुरीचा कमाल दर १० हजार २०५ रुपये एवढा होता. तर किमान दर ८ हजार ७०० आणि सरासरी दर ९ हजार ३०० रुपये मिळाला. तुरीची आवक सध्या ४०० पोत्यांवर होत आहे.

गेल्या काही दिवसांत तुरीच्या दरात स्थिरता आली होती. तुरीवर साठवणूक मर्यादा लावल्यानंतर बाजारात दर खाली येण्याची चिन्हे होती. मात्र उत्पादनातील घटीमुळे तुरीचा भाव पुन्हा सुधारत आहे. येथील बाजार समितीत कमाल दराने १० हजारांचा पल्ला गाठला आहे.

या हंगामातील तुरीची अद्याप लागवड होत आहे. जिल्ह्यात तुरीचे सरासरी ५५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी आतापर्यंत ३८ हजार हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. अद्यापही १७ ते १८ हजार हेक्टरवरील पेरणी व्हायची आहे.

मध्यंतरी पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. आता हंगाम सुरु होऊन जवळपास दीड महिना लोटला. हा विलंब पाहता तुरीचे लागवड क्षेत्र कमी होईल की काय अशी शंका आहे. येत्या आठवड्यात तुरीच्या लागवडीचा कौल स्पष्ट होऊ शकेल.

वाशीम जिल्ह्यातही बहुतांश महत्त्वाच्या बाजार समित्यांत तुरीला १० हजारांपर्यंत दर मिळतो आहे. वाशीम, रिसोड, मंगरूळपीर, कारंजा, मालेगाव हे प्रमुख बाजार असून प्रत्येक ठिकाणी सध्या मागील काही दिवसांच्या तुलनेत कमी आवक आहे. यामुळेही दर वाढत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दर आणखी सुधारण्याची शक्यता

बाजारात सध्या जुनी तूर विक्रीसाठी येत आहे. नवीन तुरीची आवक सुरु व्हायला अजून किमान पाच ते सहा महिन्यांचा अवधी लागेल. सध्या बाजारातील आवक कमी झाली आहे. बहुतांश माल विकून झाल्याने येत्या काळात तुरीचा दर आणखी सुधारण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT