Tur Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market : तुरीचे दर दबावात

Tur Rate : तुरीच्या भावात मागील महिनाभरात जवळपास ७०० रुपयांची नरमाई आली. देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही तुरीच्या भावावर दबाव आला.

Team Agrowon

Pune News : तुरीच्या भावात मागील महिनाभरात जवळपास ७०० रुपयांची नरमाई आली. देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही तुरीच्या भावावर दबाव आला. पण सणांच्या पार्श्‍वभूमीवर तुरीला मागणी वाढण्याचा अंदाज आहे. आफ्रिकेतून तूर आयात विलंबाने होत आहे. या कारणांनी तूरदरात सुधारणा अपेक्षित असल्याचे तूर बाजारातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.

तुरीच्या भावात गेल्या काही दिवसांपासून काहीशी नरमाई दिसत आहे. देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही तुरीचे भाव कमी झाले. देशातील बाजारात मागील एकाच महिन्यात तुरीच्या भावात क्विंटलमागे ७०० रुपयांची नरमाई आली. तर आंतरराष्ट्रीय बाजारतील भाव ८०० ते १४०० रुपयांनी कमी झाले आहेत.

तुरीचे भाव कमी होण्यासाठी काही कारणे आहेत. एकतर वाढलेल्या भावात तुरीचा उठाव कमी झाला होता. तर दुसरीकडे खरिपातील तुरीची लागवड ११ टक्क्यांनी वाढली आहे. म्यानमारच्या चलनाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत कमी झाल्याने भावावर परिणाम झाला. वाढलेल्या भावात तुरीच्या डाळीला भाजीपाल्याचे भाव कमी झाल्यानंतर मागणी कमी झाली. या सर्व घाडमोडींमुळे देशातील प्रक्रियादार आणि व्यापारी तुरीची गरजेप्रमाणे खरेदी करत आहेत. या सर्व घटकांचा परिणाम तुरीच्या भावावर होऊन भाव कमी झाले.\

सध्या बाजार समित्यांमध्ये तुरीला प्रतिक्विंटल सरासरी १० हजार ते १०,५०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर बाजारातील बिल्टी रेट १०,५०० ते ११,००० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे. आयात तुरीचे भाव प्रतिक्विंटल देशनिहाय ९,३०० ते ११,००० रुपयांच्या दरम्यान तुरीचे वाण आणि गुणवत्तेनुसार आहेत. आफ्रिकेतील देशांमधून आयात होणाऱ्या तुरीचे हे भाव आहेत. आफ्रिकेतील तुरीचे भाव गुणवत्तेमुळे कमी असतात, असे आयातदारांनी सांगितले. तर बर्मा देशात लेमन तुरीचा भाव १,१६५ डॉलर प्रतिटनाच्या दरम्यान आहे.

पुढे बाजार कसा राहील?

तुरीच्या भावात नरमाई आली असली तरी सध्या भाव कमी होण्याला बाजारातील सेंटीमेंट आणि तात्पुरती कारणे जबाबदार आहेत. बाजारातील तुरीचा पुरवठा आणि मागणी पाहिली तर ताळेबंद तुटीचाच आहे. पुढच्या काळात सणांमुळे तुरीच्या डाळीला मागणी वाढणार आहे. पाइपलाइनमध्ये माल खूपच कमी आहे. त्यामुळे बाजारातील मागणी आल्यानंतर व्यापाऱ्यांचीही खरेदी वाढेल. त्यातच आफ्रिकेतून तुरीची निर्यात विलंबाने होत आहे. या कारणांनी सणांच्या पार्श्‍वभूमीवर तुरीच्या दरात सुधारणा अपेक्षित असल्याचे तूर बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

राज्यनिहाय तुरीची लागवड (लाख हेक्टरमध्ये)

राज्य…लागवड

कर्नाटक…१५.६७

महाराष्ट्र…१२.११

मध्य प्रदेश…३.९४

उत्तर प्रदेश…३.४४

गुजरात…२.१३

तेलंगणा…१.७३

आंध्र प्रदेश…१.५८

छत्तीसगड…१.०१

एकूण…४५.७८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT