Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market : अकोल्यात तुरीच्या दराचा कल वाढीकडे

Tur Market Update : तुरीला क्विंटलला कमाल दर १२ हजार ७१५ रुपये मिळाला आहे. तर किमान दरही ९००५ रुपये होता.

Team Agrowon

Akola News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीच्या दरात वाढीचा कल निर्माण झालेला आहे. तुरीला क्विंटलला कमाल दर १२ हजार ७१५ रुपये मिळाला आहे. तर किमान दरही ९००५ रुपये होता. बाजारात सुरु झालेल्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेली तूर विक्रीला काढणे सुरु केले आहे.

मागील महिनाभरापासून तुरीच्या दरात वाढ होऊ लागली आहे. या आठवड्यातही हाच कल कायम होता. शुक्रवारी (ता.२२) येथील बाजार समितीत सुमारे ४७८ क्विंटलची आवक झाली. गुरुवारी (ता. २१) तूर किमान ९ हजार ४०० व कमाल १२ हजार २५० रुपयांनी विक्री झाली.

बुधवारी (ता. २०) तुरीचा दर ८ हजार ५०० ते १२ हजार ३०५ रुपये असा होता. सरासरी ९ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. मंगळवारी (ता. १९) तुरीचा सरासरी दर १० हजार ५०० रुपये होता. किमान दर ८ हजार ४०५ व कमाल १२ हजार ५०० रुपये होता. या आठवड्यात तुरीची आवक वाढत असल्याचेही समोर आले.

यंदा पीक नुकसानीत; उत्पादन घटणार

गेल्या हंगामातील साठवलेली तूर सध्या विक्रीसाठी येत आहे. नवीन हंगामाला अद्याप बराच उशीर असून यंदाचे पीकही नुकसानीच्या तडाख्यात सापडलेले आहे. प्रामुख्याने लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी तुरीच्या पिकाला बुरशीचा फटका बसला. बुरशीजन्य रोगांमुळे तुरीचे बऱ्याच क्षेत्रावरील पीक उदध्वस्त झालेले आहे. त्यामुळे यंदा तुरीच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे.

मागणी अधिक, आवक कमी

गेल्या हंगामातील तूरही बहुतांश विक्री झालेली आहे. आता थोडाफार शिल्लक असलेला साठा विक्रीसाठी निघत आहे. मागणीच्या तुलनेत तुरीची कमतरता असल्याने बाजारात दर वाढीचा कल सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे. नवीन माल बाजारात येईपर्यंत तुरीच्या दरात चढ-उताराचे चक्र कायम राहू शकते, असेही या क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT