Tomato Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agriculture Commodity Market : टोमॅटो वगळता सर्व पिकांमध्ये घसरण

Tomato Rate : गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) वाढून रु. ८५० वर आली होती; या सप्ताहात ती रु. १,००० वर आली आहे.

डॉ.अरूण कुलकर्णी

फ्यूचर्स किमती ः सप्ताह १ ते ७ फेब्रुवारी २०२५

तुरीची आवक वाढती आहे. जानेवारी महिन्यात तुरीची साप्ताहिक आवक २९ हजार टनांवरून ६२ हजार टनांपर्यंत गेली. इतर पिकांची आवक कमी होऊ लागली आहे. हरभऱ्याची आवक या महिना अखेरीस सुरू होईल.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान ११ टक्क्यांनी वाढले. या दरम्यान भारतातील भाव स्थिर राहिले. मात्र या काळात कापसाचे आंतरराष्ट्रीय व भारतातील भाव अनुक्रमे ११ व ३ टक्क्यांनी घसरले. चीनची सोयबीनसाठीची अधिक मागणी, कापसाचे वाढलेले उत्पादन व एकूण बदलती जागतिक परिस्थिती यांचा हा परिणाम आहे.

या सप्ताहात टोमॅटो वगळता सर्व वस्तूंच्या किमती कमी झाल्या.

१० फेब्रुवारी रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत ः

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) या सप्ताहात रु. ५३,०२० वर आले आहेत. मार्च फ्यूचर्स भाव ०.३ टक्क्याने वाढून रु. ५३,७४० वर आले आहेत. मे भाव रु. ५५,००० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ३.७ टक्क्यांनी अधिक आहेत. सध्या तरी कापूस स्पॉट भावाने विकणे योग्य ठरेल.

NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात रु. १,३९६ वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स ०.४ टक्का वाढून रु. १,४७५ वर आले आहेत, तर एप्रिल फ्यूचर्स रु. १,४७५ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.७ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत.

मका

NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) गेल्या सप्ताहात रु. २,४०० वर आल्या होत्या; या सप्ताहात त्या २.१ टक्क्यांनी घसरून रु. २,३५० वर आल्या आहेत. मार्च फ्यूचर्स किमती १.६ टक्का घसरून रु. २,३६९ वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स रु. २,४५७ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव ४.६ टक्क्यांनी अधिक आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा (रु. २,२२५) अधिक आहेत.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) या सप्ताहात ०.१ टक्का घसरून रु. १३,३१९ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती १.१ टक्क्याने वाढून रु. १३,४९६ वर आल्या आहेत. मे किमती रु. १३,४४४ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ०.९ टक्का अधिक आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात २.५ टक्क्यांनी घसरून रु. ५,९५० वर आल्या होत्या; या सप्ताहात त्या याच पातळीवर स्थिर आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० जाहीर झाला आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,०७५ वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे. मुगाचा हंगाम आता संपला आहे.

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) १.५ टक्क्याने वाढून रु. ४,३१८ वर आली होती. या सप्ताहात ती २ टक्क्यांनी घसरून रु. ४,२२९ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक आता कमी होऊ लागली आहे. हमीभावापेक्षा बाजार भाव कमी आहे.

तूर

गेल्या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत (अकोला) २.१ टक्क्यांनी घसरून रु. ७,६८० वर आली होती. या सप्ताहात ती १.१ टक्क्याने घसरून रु. ७,५९७ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव बसवंत) किंमत या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने घसरून रु. १,९५३ वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) वाढून रु. ८५० वर आली होती; या सप्ताहात ती रु. १,००० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT