Wheat Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Wheat Import : भारतावर गहू आयातीची वेळ

Wheat Market : यंदाही सरकारची उद्दिष्टापेक्षा कमी खरेदी, १६ वर्षांतील नीचांकी साठा आणि बाजारातील कमी आवक यामुळे देशात गव्हाचा पुरवठा वाढण्यासाठी ४० टक्के आयात शुल्क काढा, अशी मागणी देशातील प्रक्रिया उद्योगांनी केली आहे.

Team Agrowon

Pune News : गहू निर्यात करून अनेक देशांची अन्नसुरक्षा अबाधित ठेवणाऱ्या भारतालाच यंदा गहू आयात करावा लागण्याची दाट शक्यता आहे. यंदाही सरकारची उद्दिष्टापेक्षा कमी खरेदी, १६ वर्षांतील नीचांकी साठा आणि बाजारातील कमी आवक यामुळे देशात गव्हाचा पुरवठा वाढण्यासाठी ४० टक्के आयात शुल्क काढा, अशी मागणी देशातील प्रक्रिया उद्योगांनी केली आहे.

देशात गव्हाचा पुरवठा वाढावा यासाठी आधीच निर्यातबंदी केली आहे. तसेच स्टॉक लिमिटही लावले आहे. तरीही पुरवठा कमी असल्याने भावपातळी हमीभावापेक्षा जास्त आहे. यंदा गव्हाला सरकारने २ हजार २७५ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला. तर बाजारात प्रत्यक्षात २ हजार ४०० ते २ हजार ८०० रुपये भाव मिळत आहे. चालू हंगामाच्या सुरुवातीपासूनच गव्हाचे भाव हमीभावापेक्षा काहीसे अधिक होते. त्यामुळे सरकारची खरेदीही कमी झाली.

सध्या बाजारात गव्हाची आवक कमी आहे. त्यामुळे बाजारात गव्हाचा पुरवठा वाढावा यासाठी सरकारने गहू आयातीवरील ४० टक्के शुल्क काढावे, अशी मागणी नुकतेच प्रक्रिया उद्योगाने सरकारकडे केली आहे. आयात शुल्क काढल्यास देशात आयात वाढून गव्हाचा पुरवठा वाढेल. गव्हाचा बफर स्टॉक वाढण्यासही मदत होईल आणि त्यासोबतच सध्या गव्हाचा भाव गेल्या दोन वर्षांतील भावापेक्षा तब्बल १५ ते २० टक्क्यांनी जास्त आहे. हे भाव कमी होण्यालाही मदत होईल, असेही प्रक्रियादारांनी म्हटले आहे.

गव्हाचा साठाही गेल्या १६ वर्षांतील नीचांकी पातळीवर पोचला आहे. सरकारकडे गव्हाचा पर्याप्त साठा असेल तर गहू दरातील चढ उतारही नियंत्रित करता येतील. प्रक्रिया उद्योगांनाही पुरेसा गहू मिळत नाही, असेही प्रक्रियादारांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढ

भारताने गहू निर्यातबंदी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातही गव्हाचे भाव चढेच आहेत. विशेष म्हणजे मागील १० दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या भावात १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. सरकारने जर ४० टक्के आयात शुल्क काढले तर आयात वाढणार आहे. पण भारतासारखा देश आयातीत उतरल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात आणखी दरवाढ होऊ शकते, असा अंदाज काही गहू व्यापारी व्यक्त करत आहेत.

प्रक्रिया उद्योग काय म्हणतो?

- देशातील बाजारात गव्हाची आवक कमी.
- गव्हाचे भाव १५ दिवसांमध्ये ४ टक्क्यांनी वाढले.
- गहू पिठाचे भाव वाढणे शक्य नाही.
- गहू पिठाची मागणी उष्णतेमळे कमी झाली.
- पिठाची मागणी २० ते २५ टक्क्यांनी घटली.
- आयात वाढल्यास दर नियंत्रणात राहतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत हटणार नाही! भिलवडीत राजू शेट्टींचे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

Banana Farmers : केळीच्या दांड्याचे वजन ठरतेय तोट्याचे; खरेदीदारांच्या मनमानीमुळे बळीराजा त्रस्त!

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT