Turmeric  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Production : हळदीचे उत्पादन ५१ हजार टनाने घटण्याची शक्यता

Turmeric Rate : देशातील हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यांत हळद लागवडीवेळी पावसाचा विलंब, ऐन वाढीच्या काळात पावसाचा खंड याचा फटका हळद पिकाला बसला आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : देशातील हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यांत हळद लागवडीवेळी पावसाचा विलंब, ऐन वाढीच्या काळात पावसाचा खंड याचा फटका हळद पिकाला बसला आहे. परिणामी देशात हळदीचे उत्पादन ५१ हजार ८५३ टनाने घटण्याचा प्राथमिक अंदाज भारताच्या मसाला मंडळाने व्यक्त केला आहे.

देशात हळद लागवड जून महिन्यापासून सुरुवात होते. परंतु जून महिन्यात उशिरा पावसाने सुरुवात केल्याने त्याचा परिमाण हळद लागवडीवर झाला. त्यामुळे हळद लागवड उशिरा सुरू झाली. मात्र, अशाही परिस्थितीत पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी हळद लागवड करण्यासाठी पुढाकार घेतला.

त्यामुळे देशात हळदीची लागवड ३ लाख २५ हजार ६११ हेक्टरवर झाली आहे. गतवर्षी देशात ३ लाख ३३ हजार ०२४ हेक्टरवर लागवड झाली होती. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने देशात ७ हजार ४१२ हेक्टरने हळदीच्या क्षेत्रात घट झाली असल्याचे मसाला बोर्डाच्या अहवालातून स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश ओडिशा यासह अन्य राज्यांत हळद पीक घेतले जाते. मात्र, जून महिन्यात उशिरा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे लागवड लांबणीवर पडली. परिणामी महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू या चार राज्यांतील हळद लागवडीचे क्षेत्र घटले आहे.

सर्वाधिक महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांतील हळदीचे क्षेत्र सर्वाधिक घटले असल्याचे मसाला बोर्डाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यानंतर पुरेसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली. मात्र, हळद वाढीच्या काळात पुन्हा पावसाचा खंड पडल्याने परिणामी फुटवे फुटण्यास अथडळे निर्माण झाले. यासाऱ्याचा परिणाम हळद उत्पादनावर होण्याची शक्यता असून यंदा उत्पादन ५१ हजार ८५३ टनाने घटण्याचा प्राथमिक अंदाज मसाला बोर्डाने व्यक्त केला आहे.

पंधरा दिवसांत हळद काढणीस प्रारंभ

देशभरातील हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात हळद काढणीला आली आहे. राज्यात पाण्याची शाश्वत सोय असलेल्या जिल्ह्यांतील आगाप पेरणी केलेल्या हळदीची काढणी सुरू झाली आहे. परंतु अद्यापही हळद काढणीला फारशी गती आली नाही. येत्या पंधरा ते वीस दिवसांत राज्यात हळद काढणीला गती येईल, अशा शक्यता हळद व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात हळद क्षेत्रात सर्वाधिक घट

महाराष्ट्रात चार वर्षांपासून हळदीला अपेक्षित दर मिळाले. त्यामुळे शेतकरी हळद लागवडीकडे वळला. हळदीला पोषक वातावरण असल्याने हळदीच्या उत्पादनात वाढ झाली आहे. राज्यात सन २०२१-२२ मध्ये १ लाख २ हजार ६६९ हेक्टर क्षेत्रावर ३ लाख ६७ हजार ८४२ टन हळदीचे उत्पादन झाले होते.

मात्र, यंदाच्या हंगामात हळदीचे क्षेत्र ८८ हजार ३७८ हेक्टर असून उत्पादन ३ लाख २२ हजार ५२ टन उत्पादन होईल. अर्थात गतवर्षीच्या तुलनेत १४ हजार २९९ हेक्टरने घट झाली तर उत्पादनात ४५ हजार ७९० टनाने कमी होईल, असा प्राथमिक अंदाज हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे.

देशातील हळद लागवड आणि उत्पादन

वर्ष....क्षेत्र (हेक्टर)....उत्पादन (टन)

२०१९-२०...२,९६,१८१...११,७८,७५८

२०२०-२१...२,९२,७५३...११,३५,१७४

२०२१-२२...३,३३,०२४...१२,२१,७१७

२०२२-२३...३,२५,६११...११,६९,८६४ (अंदाज)

राज्यात अपुरा पाऊस झाल्याने हळद लागवड कमी झाली आहे. त्यातच वाढीच्या काळात पावसाचा खंड पडल्याने उत्पादनही कमी होण्याचा प्राथमिक अंदाज आहे.
- डॉ. मनोज माळी, प्रभारी अधिकारी, हळद संशोधन, योजना कसबेडिग्रज, जि. सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT