Team Agrowon
जमिनीच्या पोताप्रमाणे माळरानावरील हलक्या जमिनीतील पिकाचा कालावधी पूर्ण होतेवेळी ८० ते ९० टक्के पाने वाळलेली असतात.
मध्यम व भारी जमिनीमध्ये ६० ते ७० टक्के पाने वाळलेली असतात. हे पीक परिपक्वतेचे मुख्य लक्षण मानले जाते.
हळदीच्या काढणी अगोदर १५ ते ३० दिवस पाणी देणे बंद करावे. पाणी बंद करताना प्रथम पाणी थोडे थोडे कमी करून नंतर पाणी बंद करावे.
जर पिकास शेवटपर्यंत पाणी देणे सुरुच ठेवले तर हळकुंडाना नवीन फुटवे फुटू लागतात. त्यामुळे उत्पादनात घट होते.
पाला वाळल्यानंतर १ इंच जमिनीवर खोड ठेवून धारदार विळ्याच्या साह्याने हळदीचा पाला कापावा.
कापलेला पाला बांधावर गोळा करून ठेवावा. शेत ४ ते ५ दिवस चांगले तापू द्यावे. त्यामुळे हळदीच्या कंदामध्ये असलेल्या पाण्याच्या अंशामुळे जमीन भेगाळली जाते. त्यामुळे काढणी करणे सुलभ होते.
काढणीच्या साधारण २ ते ३ दिवसांनंतर हळदीच्या कंदाची मोडणी करावी. हळदीच्या कंदाचा गड्डा आपटल्यास हळकुंडे व गड्डे एकमेकांपासून वेगळे होतात.