Team Agrowon
देशातील बाजारात हळदीच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये काहीशी नरमाई दिसून आली.
चालू महिन्यापासून हळदीची बाजारातील आवक वाढणार आहे. पण यंदा हळद पिकाला यंदा कमी पाऊस, अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसला.
यामुळे उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सध्या हळदीला बाजारात ११ हजार ते १४ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
बाजारावर आवकेचा दबाव वाढल्यानंतर दरावर आणखी काहीसा दबाव येऊ शकतो.
पण यंदा हळदीचा भाव चांगला राहण्याचा अंदाज आहे.