Tea  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tea Leaves Rate : चहापत्तीचे दर वाढणार

Tea Production : देशातील चहाचे उत्पादन यावर्षी ५० टक्क्यांनी घटले आहेत. त्यामुळे चहाप्रेमींना चहाच्या घोटासाठी खिसा थोडा अधिक हलका करावा लागणार आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : देशातील चहाचे उत्पादन यावर्षी ५० टक्क्यांनी घटले आहेत. त्यामुळे चहाप्रेमींना चहाच्या घोटासाठी खिसा थोडा अधिक हलका करावा लागणार आहे. चहा पत्तीच्या दरात यंदा वाढ होण्याची शक्यता व्यावसायिक सूत्रांनी वर्तविली आहे.

आसाम आणि सिलीगुडीमध्ये यंदा पाऊस (Rain) कमी झाला आहे. त्यामुळे या परिसरात चहाचे उत्पादन ५० टक्क्यांनी कमी होण्याचे संकेत टी असोसिएशन ऑफ इंडियाने दिलेले आहेत. टी बोर्डाने जाहीर केल्यानुसार मागील वर्षीपेक्षा २०२४ मध्ये पावसाअभावी उत्पादनाला फटका बसला आहे.

त्यामुळे चहा प्रतिकिलो ५० ते १०० रुपयांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामानात झालेल्या बदलाचाही चहाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. असेच वातावरण राहिल्यास चहाच्या उत्पादनावर अधिक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुख्य सल्लागार सॅम वर्गिस यांच्या म्हणण्यानुसार, एप्रिल महिन्यात चहा बागांसाठी हवा असलेल्या पावसापेक्षा १०० मिलिमीटर पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे जमिनीतील आर्द्रता वाढल्याने उत्पादनावर परिणाम झालेला आहे.

यामुळे चहाचे कारखाने बंद करण्याची वेळ संचालकांवर आलेली आहे. परिणामी, अनेकांचा रोजगारही जाणार आहे, असे इंडियन टी असोसिएशनचे माजी अध्यक्ष जिवनचंद पांडेय यांनी सांगितले.

आसाम आणि सिलीगुडीमध्ये पावसाने दडी मारल्याने चहाचे उत्पादन निम्म्यावर आलेले आहे. परिणामी, चहाच्या दरात ५० ते १०० रुपये प्रति किलो वाढ होण्याची शक्यता आहे. चहाचा उद्योग यंदा अडचणीत सापडलेला आहे.
- अनिल अहिरकर, माजी अध्यक्ष, विदर्भ टी मर्चंट असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT