Mango Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Alphonso Mango Prices: हंगामाच्या अखेरीस हापूसचे दर चढेच

Mango Market: कोकणात हापूस उत्पादनात यंदा मोठी घट झाली असून हंगाम आता संपता संपता आहे. मात्र, अंतिम टप्प्यात आवक मर्यादित राहिल्यामुळे दर पुन्हा चढे झाले आहेत.

Team Agrowon

Pune News: चालू वर्षी हवामान बदलामुळे यंदा कोकणातील हापूसचा हंगाम उशिराने सुरू झाला. उत्पादनातही ४० टक्के घट झाल्याने पुढील ४ ते ५ दिवसांत हंगाम आटोपण्याची चिन्हे आहेत. बाजारपेठेत हापूसची आवक अवघ्या एक हजार पेट्यांवर आली असून, हंगामाच्या अखेरीसही हापूसचे भाव चढेच आहेत. दरवर्षी हंगामाच्या अखेरीस ४०० रुपये डझनापर्यंत येणारा हापूस यंदा ६०० रुपयांवर टिकून असल्याची स्थिती आहे.

कोकणातील हापूस आंब्याची ग्राहक आतुरतेने दरवर्षी वाट पाहत असतात. मार्केट यार्डातील फळबाजारात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड भागांतून हापूस मोठ्या प्रमाणात दाखवत होतो. सुरुवातीला हंगामाच्या दर सर्वांना परवडतील असे नाही. मात्र अक्षय्य तृतीयेनंतर हापूसचे भाव आवाक्यात येतात.

यंदा वातावरणातील बदलामुळे मोहोर गळाल्याने आवक कमी होत होती त्यामुळे गुढीपाडव्याला डझनाला १ हजार ते १८०० रुपये मोजावे लागले. मात्र अक्षय तृतीयेला आवक वाढल्याने डझनाचे दर ४०० ते ८०० रुपयांपर्यंत खाली आले. दरम्यान, मागणी वाढू लागली; परंतु अंतिम टप्प्यात हंगाम आल्याने आवक अपुरी पडू लागली. आवक वाढण्याची शक्यता नसल्याने दर पुन्हा ६०० ते १ हजार रुपयांवर स्थिरावले आहेत.

पुणे मार्केट यार्डातील हापूसचे दर

उत्पादन क्षेत्र रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड

मार्केट यार्डातील आवक एक हजार पेटी (४ ते ९ डझन)

४ ते ९ डझन (कच्चा) एक हजार ५०० ते ४ हजार रुपये

४ ते ९ डझन (तयार) २ हजार ते ४ हजार ५०० रुपये

किरकोळ दर (१ डझन) ६०० ते १ हजार रुपये

यंदा लहरी वातावरणामुळे उत्पादनात मोठी घट झाली. अति उष्णतेचा फटकाही हापूसला बसला. सद्य:स्थितीत हापूसचा हंगाम संपल्यात जमा आहे. तुरळक आवक होत राहील.
अरविंद मोरे, हापूसचे व्यापारी, मार्केट यार्ड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विर्दभात पावसाचा जोर वाढणार; मराठवाड्यात काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज

Microbial Soil Management: अन्नद्रव्य व्यवस्थापनात सूक्ष्मजीव महत्त्वाचे

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT