Banana Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Export : दाक्षिणात्य भागात निर्यातीच्या केळीची आवक वाढली

Banana Market : देशात निर्यातीच्या केळीची आवक आंध्र प्रदेशात वाढली आहे. तेथून आखातसह इतर भागांत रोज २० ते २२ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची पाठवणूक सुरू आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : देशात निर्यातीच्या केळीची आवक आंध्र प्रदेशात वाढली आहे. तेथून आखातसह इतर भागांत रोज २० ते २२ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची पाठवणूक सुरू आहे.

तमिळनाडू भागातूनही रोज पाच ते सहा कंटेनर केळीची निर्यात होत आहे. निर्यातीच्या केळीचे दर सध्या प्रतिक्विंटल १६०० ते १७५० रुपये, असे दाक्षिणात्य भागात आहेत. राज्यात सोलापूर व लगतच्या भागातून रोज १० ते १२ कंटेनर केळीची निर्यात परदेशात होत आहे.

खानदेशात अद्यापही निर्यातीच्या केळीची आवक कमी किंवा अत्यल्प आहे. थंडीत खानदेशात केळी बागा व्यवस्थित येत नसल्याने थंडीत काढणीवर येणाऱ्या बागांची लागवड टाळली जाते. यामुळे सध्या खानदेशात केळीची आवक अत्यल्प स्थितीत किंवा कमीच आहे. सध्या खानदेशात रोज २५ ते ३० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे.

पिलबाग किंवा खोडवा बागांमध्ये मुक्ताईनगर, रावेर, यावल, धुळ्यातील शिरपूर भागात आवक सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जामनेर, जळगाव भागातील उशिराच्या कांदेबाग केळीची काढणी १०० टक्के पूर्ण झाली आहे. पिलबाग केळीचे दर खानदेशात १२०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.

दर्जेदार केळीला किंवा नॉन चिलिंग बागांमधील केळीचे दर खानदेशात १६०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. कमी दर्जाच्या केळीचे दर ६००, ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. केळीची आवक सध्या थंडीमुळे रखडत सुरू आहे.

निर्यातीला फेब्रुवारीअखेर गती शक्य

थंडीचे आगमन पुन्हा एकदा खानदेशात झाले असून, यामुळे केळीची आवक पुन्हा एकदा लांबणीवर पडणार आहे. कारण थंडीत केळी पक्व होण्याची गती मंद होते. यामुळे खानदेशात जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, धुळ्यातील शिरपूर भागातून केळीची आवक फेब्रुवारीअखेर सुरू होईल. या काळात निर्यातक्षम केळी अधिकची या भागात उपलब्ध होईल. याच काळात आखातातील निर्यातीसही गती येईल, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT