Jowar  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Jowar Procurement In Telangana : तेलंगणा सरकार करणार हमीभावाने ज्वारीची खरेदी

Jowar Price : बाजारात तेलंगणा ज्वारीला सध्या तेलंगणा कृषी पणन विभागाच्या आकडेवारीनुसार प्रतिक्विंटल १ हजार ८०० ते १ हजार ९०० च्या दरम्यान दर मिळत आहे.

Team Agrowon

Jowar Rate : महाराष्ट्राच्या शेजारील तेलंगणा राज्यात ज्वारीची किमान आधारभूत किमतीने (हमीभाव) तेलंगणा राज्य सरकार खरेदी करणार असल्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी शुक्रवारी (ता.१२) केली आहे.

रब्बी ज्वारीच्या खरेदीबाबत शुक्रवारी सचिवालयात कृषी व मार्कफेड अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

रब्बी हंगामातील ज्वारीची काढणी जवळपास आटोपली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ज्वारी बाजारात दाखल झाली आहे.

परंतु ऐन आवकेच्या हंगामात बाजारातील भाव हमीभावाच्या खाली असल्यामुळे संकरीत ज्वारीची तेलंगणा सरकार २ हजार ९७० रुपयांनी ६५ हजार ४९४ टन खरेदी करणार आहे.

मार्कफेड एजन्सीच्याद्वारे ही खरेदी करण्यात येणार आहे. ज्वारीच्या खरेदीसाठी मार्कफेड एजन्सीला तेलंगणा सरकारने बँक आणि वित्तीय संस्थांकडून २२० कोटी कर्ज घेण्यासाठी सरकारने सूचना केल्या आहेत. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्य रब्बी ज्वारीच्या उत्पादनात अग्रेसर आहेत.

देशातील एकूण उत्पादनात या चार राज्यांचा वाटा सर्वाधिक आहे. केंद्र सरकारने रब्बी हंगामातील संकरीत ज्वारीसाठी २ हजार ९७० रुपये आणि मालदांडीसाठी २ हजार ९९० रुपये हमीभाव जाहीर केला आहे.

परंतु तेलंगणा बाजारात ज्वारीला सध्या तेलंगणा कृषी पणन विभागाच्या आकडेवारीनुसार प्रतिक्विंटल १ हजार ८०० ते १ हजार ९०० च्या दरम्यान दर मिळत आहे.

केंद्र सरकार दर वर्षी ज्वारीसाठी हमीभाव जाहीर करतं. परंतु ज्वारीची सरकारी खरेदी किरकोळ होते. त्यामुळे हमीभाव कागदावरच राहतात. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. परंतु तेलंगणा सरकारने आता ज्वारी खरेदीसाठी बाजारात उतरणार असल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर रयथू स्वराज्य वेदिका या संघटनेने ज्वारीची हमीभावाने खरेदी करण्यासाठी तेलंगणा सरकार विरुद्ध उच्च न्यायलयात जनहित याचिका दाखल केली होती.

त्यावर उच्च न्यायालयाने तेलंगणा सरकारला नोटीस दिली होती. न्यायलयाच्या नोटीसीनंतर तेलंगणा सरकारने नमतं घेत हमीभावाने ज्वारीची खरेदी करायला मान्यता दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat GR : सप्टेंबरमधील शेतीपिकांच्या नुकसानीसाठी १ हजार ३५६ कोटी रुपयांचे होणार वितरण; शासन निर्णय जारी

Monsoon Update: मॉन्सून देशाबाहेर

Maharashtra Rain Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज

Organic Fertilizer : भरडधान्याच्या उत्पादकतेत जैविक निविष्ठांचे मोठे योगदान ः तायडे

Raju Shetti: चालू हंगामात उसाला प्रतिटन ३,७५१ रूपये विनाकपात पहिली उचल मिळावी, राजू शेट्टींनी कारखानदारांना दिली १० नोव्हेंबरची डेडलाईन

SCROLL FOR NEXT