Tamarind  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Tamarind Market : तासगाव बाजार समितीत चिंचेचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. चिंचेची आवक मंदावली असली तरी दर टिकून आहेत.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : तासगाव बाजार समितीत चिंचेचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. चिंचेची आवक मंदावली असली तरी दर टिकून आहेत. हंगाम सुरू झाल्यापासून १००० पोत्यांची (एक पोते ५० किलोचे) विक्री झाली आहे. येत्या पंधरा दिवसापर्यंत दर स्थिर राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

गतवर्षी पाऊसमान कमी होते. याचा फटका चिंचेच्या उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात चिंचेचे उत्पादन ३० टक्क्यांनी घटेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. त्यामुळे बाजार समितीत चिंचेची आवक कमी आहे. हंगामाच्या सुरवातीला ६० ते ७० पोत्यांची आवक झाली.

फेब्रुवारीच्या मध्यापासून चिंच काढणीला गती आली. त्यामुळे चिंच आवकेत वाढ झाली. तासगाव बाजार समितीत दर बुधवारी चिंचेचे सौदे होतात. आठवड्याला १५० ते २०० पोत्यांची आवक होत होती. चिंचेची आवक वाढली असली तरी गतवर्षीच्या तुलनेत ती कमीच राहिली. त्यामुळे चिंचेचे दर हंगामाच्या प्रारंभापासून टिकून राहिले. त्यामुळे चिंच उत्पादकांना दर वाढीचा फायदा झाला.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून चिंच हंगाम अंतिम टप्प्याकडे आला. त्यामुळे आवक कमी झाली. सध्या बाजार समितीत आठवड्याला ५० पोत्यांची आवक होत असून तेवढ्याच पोत्यांची विक्री होत आहे. दर स्थिर आहेत.

सध्या वाढत्या उष्णतेमुळे चिंचेचा रंग बदलू लागला आहे. त्यामुळे त्याचा परिमाण येत्या काळात दरावर होण्याची शक्यताही व्यापाऱ्यांनी वर्तविली. तासगावात चिंचेला प्रतिक्विंटल ७३०० ते ८५०० रुपये असा दर मिळत आहे. अघडन चिंचेचे दर टिकून आहेत. या चिंचेला प्रति १९०० ते २००० रुपये दर आहे.

यंदाचा चिंचेचा हंगाम साडेतीन महिने चालला आहे. हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या दर टिकून आहेत. परंतु वाढत्या उष्णतेचा फटका चिंचेला बसू लागला असून चिंचेचा रंग बदलू लागला आहे. त्याचा परिणाम दरावर होईल.
- कुमार शेटे, चिंच व्यापारी, तासगाव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT