Sugar Quota Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Quota: मे चा साखरविक्री कोटा घटवला

Sugar Market Update: यंदा साखर उत्पादनात घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मे महिन्यासाठी देशातील साखर विक्री कोटा कमी केला आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News: केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने देशातील साखर कारखान्यांना मे महिन्यासाठी साडेतेवीस लाख टनांचा साखर कोटा जाहीर केला आहे. गेल्या वर्षी या महिन्यासाठी वर्षी २७ लाख टनांचा साखर कोटा दिला होता. यंदा साखर उत्पादनात घट आल्याने केंद्राने गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्री कोटाही कमी केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मेमध्ये कोटा कमी दिल्याने याचा सकारात्मक परिणाम साखरेच्या दरवाढीवर होण्याची शक्‍यता आहे.

सध्या देशभरात उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. यामुळे आईस्क्रीम व शीतपेय उद्योगातून साखरेच्या मागणीत सातत्य आहे. परिणामी साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता साखर उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी केंद्राने एप्रिल व मे चा साखरेचा कोटा जादा दिला होता. साखरेच्या किमती स्थिर राहाव्यात हा उद्देश होता. गेल्या वर्षीपेक्षा साखरेचा कोटा मे साठी साडेतीन लाख टनांनी कमी आहे.

या महिन्यात कारखान्यांना साखरेची मर्यादित विक्री करता येणार असल्याने कारखाने गेल्या वर्षीपेक्षा कमी प्रमाणात साखर विक्री करू शकतील यामुळे बाजारात साखर दरात काहीशी वाढ होण्‍याचा अंदाज साखर उद्योगातून व्यक्‍त होत आहे.
बाजारपेठेतील तज्ज्ञांच्या मते, गेल्या वर्षी मेमध्ये साखरेचा वापर २६.१० लाख टन होता. मे साठी जाहीर केलेला कमी कोटा व अपेक्षित वापर पहाता या महिन्यात काही प्रमाणात साखरेची चणचण राहील याचा फायदा साखरेच्या दरवाढीवर होईल, अशी शक्यता आहे.

सध्या देशातील अन्य राज्यांतील हंगाम उत्तर प्रदेश वगळता संपला आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांत यंदा अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन झाल्याने साखरेचे गेल्‍या वर्षीच्या तुलनेत कमी उत्पादन झाले. यामुळे साखरेच्या दरातही मार्चनंतर वाढ पाहवयास मिळाली. उत्पादन कमी झाले असले तरी पुढील हंगामाच्या प्रारंभापर्यंत जितका अपेक्षित साठा शिल्लक हवा तितका तो राहू शकतो. यामुळे पुढील हंगाम सुरू होईपर्यंत मोठ्या प्रमाणात साखरेची टंचाई भासेल अशी शक्‍यता नसल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले. सध्‍या ३७०० ते ३८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत साखरेच्या किमती आहेत. मे अखेरपर्यंत किमान ३९०० रुपयांपर्यंत साखरेचे दर वाढू शकतील, असा अंदाज आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत मे चा कमी केलेला साखर कोटा कारखान्यांच्या पथ्यावर पडेल. उन्हाळा व अन्य कार्यक्रमांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने साखरेच्या मागणीत वाढ होऊन दरही वाढू शकतात.
पी. जी. मेढे, साखर तज्ज्ञ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT