Sugar Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Rate : श्रावणातील वाढत्या मागणीमुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता

Sugar Market : देशात सध्या साखरेचे दर स्थिर आहेत. श्रावणाच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या साखरेचे दर राज्यानुसार ३७०० ते ३९०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : देशात सध्या साखरेचे दर स्थिर आहेत. श्रावणाच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या साखरेचे दर राज्यानुसार ३७०० ते ३९०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. जुलैचा कोटा घटविल्यानंतर क्विंटलला ५० रुपयांपर्यंतची वाढ झाली होती. ती वाढ कायम आहे.

श्रावण महिना आणि त्यानंतर येणारे सण, विशेषतः गणेश चतुर्थी, नवरात्री आणि दिवाळी, या काळात साखरेच्या मागणीत लक्षणीय वाढ अपेक्षित असते. ही वाढ केवळ मिठाईच्या दुकानांकडूनच नाही, तर घरगुती वापरासाठीही मोठ्या प्रमाणात होते. यामुळे नजीकच्या काळात साखरेचे दर तेजीत राहतील, असा अंदाज आहे.

यंदा साखर उत्पादन कमी असल्याने केंद्राने सातत्याने साखर विक्री कोट्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत घट केल्याने दरात घसरण फारशी नाही. कमी झालेले साखर उत्पादन, घटविलेला कोटा व संभाव्य सणांच्या पार्श्वभूमीवर साखर दरात तेजी अपेक्षित आहे. सध्या साखरेच्या मागणीत हळूहळू वाढ होत असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले.

प्रत्येक वर्षांनी सणांच्या काळात साखरेच्या मागणीत १५ ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून येते. ही वाढ श्रावण महिन्यापासून हळूहळू सुरू होते आणि दिवाळीपर्यंत वाढते. सध्या भारतात साखरेचा साठा (स्टॉक) पुरेसा आहे. ३० सप्टेंबर अखेर साखरेचा शिल्लक साठा अंदाजे ५२ लाख मेट्रिक टन असेल, जो ३० सप्टेंबर २०२४ रोजीच्या ८० लाख टन साठ्याच्या तुलनेत कमी आहे.

हा साठा सुमारे दोन महिन्यांच्या वापराच्या बरोबरीचा आहे. देशात साखरेची सरासरी मासिक मागणी सुमारे २३.५० लाख टन इतकी असते. तथापि, सणांच्या काळात, विशेषतः श्रावण, गणेश चतुर्थी, नवरात्री आणि दिवाळीमध्ये, ही मागणी वाढते.

कमी कोटा दिल्यास दर तेजीत राहणार

गेल्या हंगामातील कमी साखर उत्पादन व मागणी वाढण्याची शक्यता असल्याने केंद्र पुढील दोन महिन्यांत साखर कोट्याबाबत कोणते धोरण आखते यावर साखर दराच्या किमती अवलंबून असल्याचे चित्र आहे. यंदाच्या ऑगस्टमध्ये गेल्या ऑगस्टच्या तुलनेत कमी कोटा दिल्यास साखरेच्या किमती काहीशा तेजीत राहातील, असा अंदाज आहे.

पुढील साखर हंगामापर्यंत अपेक्षित साठा राखणे व किरकोळ बाजारात साखरेचे दर अवास्तव वाढू न देणे या दोन्हीचा अंदाज घेऊन पुढील दोन महिन्यांतील साखर कोटे ठरविण्यात येत असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

देशातील राज्यवार साखरेचे दर असे ः दर्जानुसार, प्रति क्विंटल रुपये, किमान- कमाल

राज्य---एस ग्रेड---एम ग्रेड

महाराष्ट्र---३७८५ - ३८०५---३८४५ -३८८५

कर्नाटक---३९५०- ३९५० -

उत्तर प्रदेश - ३९०० - ३९६०

गुजरात---३८७१ -३९११---३९२१ - ३९४१

तमिळनाडू---४०१५ -४१६५---४०६५ - ४२००

मध्य प्रदेश---३८९०-३९१०---३९६०-३९८०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crop Import : जीएम अन्नपदार्थांना लगाम घाला; गाय आधारित सेंद्रिय शेतीला चालना द्या, भारतीय किसान संघाची मागणी

Mosambi Pest Control : नवीन किडीविषयी संशोधन करून त्यावर उपाययोजना करणार

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

Onion Market : कांदा बाजारभावावरील गंभीर स्थितीवर लासलगावी होणार चर्चा

Ladki Bahin Yojana: ५० लाखांवर लाडक्या बहीणींना मिळणार डच्चू; अपात्र बहीणींची संख्या वाढणार

SCROLL FOR NEXT