Farmers Oath Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean MSP : ‘एमएसपी’पेक्षा अधिक भावानेच सोयाबीन विकणार

Farmers Oath : कोरडवाहू बहुल क्षेत्र असलेल्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अलीकडील काही वर्षांत खरीप हंगामातील सोयाबीन हे प्रमुख पीक आहे.

माणिक रासवे

Parbhani News : जिल्ह्यात सोयाबीन दरप्रश्‍नी लढा उभारला जाणार असून, याअंतर्गत शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे. गुरुवारी (ता. २९) शिर्शी (ता. सोनपेठ) येथील शेतकऱ्यांनी सोयाबीनची हमीभाव (एमएसपी) पेक्षा अधिक भावानेच विक्री करणार, अशी शपथ घेतली आहे, अशी माहिती रावराजूर (ता. पालम) येथील प्रगतिशील शेतकरी तथा शेती प्रश्‍नांचे अभ्यासक हेमचंद्र शिंदे यांनी दिली.

कोरडवाहू बहुल क्षेत्र असलेल्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अलीकडील काही वर्षांत खरीप हंगामातील सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. कपाशीच्या तुलनेत सोयाबीन किफायतशीर ठरत असल्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. परंतु मागील अनेक महिन्यांपासून सोयाबीनच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यंदाच्या खरिपात जिल्ह्यात २ लाख ८० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्च वाढला आहे. विविध कारणांनी उत्पादकता कमी झाली आहे. या स्थितीत दरात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अधिकच आर्थिक नुकसान होत आहे.

सोयाबीनच्या बाजारभाव जनजागृती मोहिमे अंतर्गत शिर्शी (ता. सोनपेठ) येथे हेमचंद्र शिंदे यांनी भारतातील सोयाबीन उत्पादक शेतकरी माझे कष्टाने पिकविलेले सोयाबीन एमएसपीपेक्षा अधिक भावानेच विकणार आहे.

खाद्य तेलात आत्मनिर्भर होण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने तेल आयात करुन शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणले आहे. अशा सरकारी धोरणांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची तसेच यापुढे शेती व शेतकऱ्यांवर होणाऱ्या कोणत्याही अन्यायाविरुद्ध संघटितपणे लढण्याची शपथ शेतकऱ्यांना दिली.

या वेळी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विश्‍वंभर गोरवे, सुभाष कदम, शिर्शी येथील भागवत सोळंके, अरुण मुंडे, किरण सोळंके, गोविंद लांडगे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crop Import : जीएम अन्नपदार्थांना लगाम घाला; गाय आधारित सेंद्रिय शेतीला चालना द्या, भारतीय किसान संघाची मागणी

Mosambi Pest Control : नवीन किडीविषयी संशोधन करून त्यावर उपाययोजना करणार

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला

Onion Market : कांदा बाजारभावावरील गंभीर स्थितीवर लासलगावी होणार चर्चा

Ladki Bahin Yojana: ५० लाखांवर लाडक्या बहीणींना मिळणार डच्चू; अपात्र बहीणींची संख्या वाढणार

SCROLL FOR NEXT