Turmeric
Turmeric  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agriculture Commodity Market : सोयाबीन स्थिर; हळदीच्या दरात वाढ

डॉ. अरुण कुलकर्णी

डॉ. अरुण कुलकर्णी

फ्यूचर्स किमती : सप्ताह २३ ते २९ मार्च २०२४

१ एप्रिलपासून NCDEX मध्ये हळदीचे ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी व्यवहार सुरू होतील. त्याचप्रमाणे MCX मध्ये कपाशीचे एप्रिल २०२५ डिलिव्हरीसाठी व्यवहार सुरू होतील. यामुळे १ एप्रिलपासून NCDEX मध्ये मक्याचे एप्रिल, मे, जून व जुलै डिलिव्हरीसाठी व हळदीचे जून, ऑगस्ट व ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी व्यवहार उपलब्ध असतील.

MCX मध्ये कापसाचे मे डिलिव्हरीसाठी व कपाशीचे एप्रिल, नोव्हेंबर, फेब्रुवारी (२०२५) व एप्रिल (२०२५) डिलिव्हरीसाठी व्यवहार करता येतील.

रब्बी पिकांमधील हरभऱ्याची आवक वाढत आहे. १५ मार्च रोजी संपलेल्या सप्ताहात आवक १३७ हजार टन होती. गेल्या वर्षीची सर्वाधिक १२८ हजार टन आवक (३ मार्च २०२३) होती. या सप्ताहात भाव २.७ टक्क्यांनी कमी झाले.

या सप्ताहात बहुतेक सर्व पिकांचे भाव कमी झाले. कांदा व हळदीचे भाव मात्र वाढले. सोयाबीन स्थिर राहिले. २९ मार्च २०२४ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत :

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात रु. ६०,६६० वर आले होते. या सप्ताहात ते ०.४ टक्क्याने कमी होऊन रु. ६०,४२० वर आले आहेत. मे फ्यूचर्स भाव ०.२ टक्क्याने घसरून रु. ६२,००० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा २.६ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाची आवक कमी होत आहे. फेब्रुवारीपासून कापसाच्या भावात वाढीचा कल आहे.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात ०.२ टक्क्याने घसरून रु. १,४९४ वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,६५६ वर आले आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात १.७ टक्क्याने घसरून रु. २,२०० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (एप्रिल) किमती रु. २,२१० वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती रु. २,२३७ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.३ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे. मक्याची आवक कमी होत आहे; भाव रु. २,२०० ते रु. २,३०० या दरम्यान वर-खाली होत आहेत.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात रु. १६,५२८ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.८ टक्क्याने वाढून रु. १६,५५९ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती २ टक्क्यांनी घसरून रु. १७,१३८ वर आल्या आहेत. जून किमती रु. १७,६०८ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ५.७ टक्क्यांनी जास्त आहेत. हळदीची आवक वाढत आहे; किमतीसुद्धा जानेवारीपासून वाढत आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात रु. ५,६५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.७ टक्क्यांनी घसरून रु. ५,५०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक वाढत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून हरभऱ्याचे भाव घसरत आहेत.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ९,३०० वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता कमी होत आहे. भाव डिसेंबरपासून सतत वाढत आहेत.

सोयाबीन

सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) रु. ४५७० वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे. आवक कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भावात घसरण आहे. भारतातही नोव्हेंबरनंतर भाव घसरत आहेत.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ९,७७५ वर आली होती. या सप्ताहात ती याच पातळीवर आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे. मागणीमुळे नोव्हेंबरपासून भाव वाढत आहेत.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. १,३७५ होती; या सप्ताहात ती रु. १,४६६ वर आली आहे. गेल्या तीन महिन्यांत कांद्याची आवक स्थिर आहे; किमती मात्र ८ मार्चपासून घसरत आहेत. रब्बीची आवक पुढील महिन्यात सुरू होईल.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. १,०७५ वर आली होती. या सप्ताहात ती रु. १,००० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT