Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : सोयाबीनला हमीपेक्षा कमी भाव

Soybean Market : शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदीची केंद्रे सुरू केली असली तरी त्याला शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीत सोयाबीन विकावे लागत आहे.

Team Agrowon

Dhule News : शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदीची केंद्रे सुरू केली असली तरी त्याला शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीत सोयाबीन विकावे लागत आहे. आठवडाभरात बाजार समितीत केवळ ४३२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली.

हायब्रीड सोयाबीनची सर्वाधिक चार हजार १६५ रुपये, तर पिवळ्या सोयाबीनची चार हजार २४५ प्रतिक्विंटलने खरेदी होत आहे. गेल्या आठवडाभरात २८ नोव्हेंबरला बाजार समितीत अधिक १०४ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली. तसेच शुक्रवारी (ता. २९) बाजार समितीत ३७ क्विंटल आवक झाली. सर्वाधिक दर चार हजार २२०, तर किमान चार हजार रुपये प्रतिक्विंटल मिळाला. सर्वसाधारण दर तीन हजार ६१० रुपये राहिला.

हमीभाव जाहीर

सोयाबीनला सरकारने प्रतिक्विंटल चार हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. सध्या धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला सरासरी चार हजार ते चार हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनचे दर कमी असल्याने सरकारने हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून १५ ऑक्टोबरपासून सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आली. सुरुवातीला सोयाबीनमधील ओलाव्याचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा कमी हवे, या निकषामुळे खरेदीला वेग आला नाही.

त्यानंतर सरकारने ओलाव्यातील निकषात बदल केले. ओलाव्याचे प्रमाण १२ टक्क्यांहून १५ टक्क्यांपर्यंत नेण्यात आले. सोयाबीनच्या दरात गेल्या आठवडाभरात सुमारे तीनशे रुपयांची घसरण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT