Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Procurement : बियाणे कंपन्यांची बाजार समित्यांमध्ये सोयाबीन खरेदी

यंदा बियाण्याचे प्लॉट पावसामुळे यशस्वी न झाल्यामुळे खुल्या बाजारातून सोयाबीन खरेदी होत असल्याची माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यापासून भाव स्थिर झाले असून, बीजवाईच्या फुले संगम वाणालाच सध्या चांगला दर मिळत आहे.

टीम ॲग्रोवन

रिसोड, जि. वाशीम ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही बियाणे कंपन्यांचे (Seed Companies) प्रतिनिधी फुले संगम (Phule Sangam Seed) या सोयाबीन वाणाची बियाण्यासाठी (Soybean Seed Verity) खरेदी करीत आहेत. यंदा बियाण्याचे प्लॉट (Seed Plot) पावसामुळे यशस्वी न झाल्यामुळे खुल्या बाजारातून सोयाबीन खरेदी (Seed Procurement) होत असल्याची माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यापासून भाव स्थिर झाले असून, बीजवाईच्या फुले संगम वाणालाच सध्या चांगला दर मिळत आहे.

सोयाबीन काढणीचा हंगाम संपला आहे. काढणीच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन डागाळलेले आहे. या मालाची साठवणूक करता येत नसल्यामुळे तसेच रब्बी व इतर खर्चासाठी शेतकरी सोयाबीनची विक्री करीत आहे.

सोयाबीन पूर्णपणे सुकल्यामुळे सोयाबीनला भावही चांगला मिळत आहे. येथील बाजार समितीमध्ये ५१५० ते ५८२५ रुपयांपर्यंत भाव मिळाला. आवकही सात हजार क्विंटलपर्यंत झाली होती. सोयाबीनच्या दरात तेजी आली असून, मागील आठवड्याभरापासून सोयाबीनचे भाव पाच हजार ते ५८०० दरम्यान स्थिर झाले आहेत.

या वर्षी सुरुवातीपासूनच तसेच काढणीच्या वेळी झालेल्या पावसामुळे बहुतांश वाणांचे सोयाबीन खराब झाले. फुले संगम हा उशिराने येणार वाण असल्यामुळे या सोयाबीनच्या वाणाला पावसाचा तितका फटका बसला नव्हता. या सोयाबीनचा दर्जा चांगला मिळाला.

यंदा बियाण्याचे काही प्लॉट पावसाच्या कचाट्यात सापडल्याने खराब झाले. परिणामी, आता काही बियाणे कंपन्या खुल्या बाजारामधून बीजवाई सोयाबीनची खरेदी करीत आहेत. त्यामुळे फुले संगम वाणाला इतर सोयाबीनपेक्षा थोडा दर अधिक मिळत आहे. बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी बाजार समितीच्या ओट्यावर उपस्थित राहून चांगल्या दर्जाची सोयाबीन खरेदी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT