Soymeal  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soymeal Export: सोयापेंड निर्यातीत २३ टक्क्यांची घट; सोयापेंडचा भावही कमी झाला

India Soymeal Market: देशातून सोयापेंड निर्यातीत २३ टक्क्यांची घट झाली असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचे दरही घसरले आहेत. मागणी कमी झाल्याने आणि पुरवठा वाढल्याने सोयापेंडचा भाव ३८० डॉलरवरून ३६० डॉलर प्रतिटनांपर्यंत खाली आला आहे, असे एसईएने स्पष्ट केले आहे.

Anil Jadhao 

Pune News: देशातून तेलबिया पेंडची निर्यात १२ टक्क्यांनी कमी झाली आहे. तर सोयापेंड निर्यातीतही मोठी घट झाली. चालू हंगामात ५ महिन्यांमध्ये सोयापेंड निर्यात २३ टक्क्यांनी कमी झाली. तसेच मागील महिन्याभरात सोयापेंडच्या भावातही घट झाली, असे एसईएने म्हटले आहे. 

द साॅल्वेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसईएने सोयापेंडची निर्यात चालू आर्थिक वर्षात एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या काळात १९ लाख ४० हजार टन झाली. मागच्या वर्षी याच ११ महिन्यांमध्ये १९ लाख ३४ हजार टन निर्यात झाली होती. म्हणजेच यंदाही गेल्यावर्षीच्या दरम्यान निर्यात झाली. भारताच्या सोयापेंडचे मुख्य ग्राहक जर्मनी आणि फ्रान्स हे दोन देश ठरले आहेत.

युरोपियन देशांनी ११ महिन्यांमध्ये भारतातून जवळपास ६ लाख टन सोयापेंडची आयात केली आहे. मात्र ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या हंगामात सोयापेंड निर्यात २३ टक्क्यांनी घटली आहे. तर चालू हंगामात केनिया भारताच्या सोयापेंडचा सर्वात मोठा आयातदार ठरला. केनियाने जवळपास दीड लाख टन सोयापेंड भारताकडून खरेदी केली.

एसईएच्या माहितीनुसार, देशातून होणारी तेलबिया पेंडेची निर्यात १२ टक्क्यांनी कमी झाली. चालू वर्षात ११ महिन्यांमध्ये देशातून ३९ लाख टन सोयापेंड निर्यात झाली. मागच्या वर्षी याच काळात जवळपास ४५ लाख टनांची निर्यात झाली होती. फेब्रुवारी महिन्यातही तेलबिया निर्यात कमी झाली आहे. मोहरी पेंडेला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाली आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत जवळपास १७ लाख टनांची निर्यात झाली. मात्र मागीलवर्षी याच काळातील निर्यात २० लाख ३९ हजार टन होती.

चालू हंगामातील सोयापेंड निर्यात घटली

देशात सोयाबीनचा हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होतो. चालू आर्थिक वर्षात सोयापेंड निर्यात काहीशी वाढलेली दिसते. मात्र ऑक्टोबर महिन्यापासून सुरु झालेल्या चालू हंगामात निर्यात कमी झाली. ऑक्टोबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या ५ महिन्यांमध्ये देशातून १० लाख ३१ हजार टन सोयापेंड निर्यात झाली. मागील हंगामात याच ५ महिन्यांमध्ये तब्बल १३ लाख ४७ हजार टन सोयापेंडची निर्यात झाली होती. म्हणजेच यंदा सोयापेंड निर्यातीत तब्बल २३ टक्क्यांची घट झाली आहे, असेही एसईएने म्हटले आहे. 

सोयापेंडच्या भावात नरमाई

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे भाव कमी झाले आहे. वाढलेला सोयापेंडचा पुरवठा आणि कमी झालेली मागणी, याचा दरावर परिणाम दिसत आहे. त्यामुळे सोयापेंडचा भाव मागील महिन्यातील ३८० डाॅलर प्रतिटनांवरून कमी होऊन सध्या ३६० डाॅलर प्रतिटनांवर आला आहे. याचा परिणाम सोयाबीनच्या दरावरही होत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT