Soybean Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Market : सोयाबीनची आवक वाशीममध्ये टिकून

Soybean Rate : सोयाबीन व इतर प्रमुख शेतीमालाच्या विक्रीसाठी ओळख तयार झालेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन आवक टिकून आहे.

 गोपाल हागे

Washim News : सोयाबीन व इतर प्रमुख शेतीमालाच्या विक्रीसाठी ओळख तयार झालेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन आवक टिकून आहे. प्रामुख्याने सोयाबीनची आवक सुमारे चार हजार क्विंटलपर्यंत होत असून सध्या सोयाबीनला किमान ४२५० व कमाल ४४५० रुपयांचा दर मिळतो आहे.

वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीतील दराकडे सोयाबीन उत्पादकांचे सातत्याने लक्ष असते. या बाजारात अनेकदा सोयाबीनला उच्चांकी असा दर मिळाला. ठिकठिकाणचे व्यापारी, बियाणे कंपन्या या बाजारांतून सोयाबीनची खरेदी करीत असतात.

सध्या पेरण्यांचा कालावधी सुरू असला तरी शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले सोयाबीन विक्रीला काढल्याने येथील आवकेत तितकासा फरक पडलेला दिसून येत नाही.

बाजारात सध्याही साडे तीन ते चार हजार क्विंटलपर्यंत सातत्याने आवक होत आहे. येथील दरामध्ये स्थिरता आलेली दिसून येते. सोयाबीनचा दर वाढेल या उद्देशाने शेतकऱ्यांनी साठा करून ठेवला होता. मात्र, जुलै सुरू झाला तरीही दरांमध्ये फारशी वाढ झालेली नाही आणि येत्या काळात दर वाढीची शक्यताही दिसून येत नाही. त्यामुळे आता गरजेपोटी सोयाबीन विक्रीला काढले जात आहे. यामुळेच आवक कायम वाढलेली आहे.

हरभरा विकतोय साडे सहा हजारांपर्यंत...

या जिल्ह्यात रब्बीत हरभऱ्याचे प्रमुख पीक घेतले जाते. या हरभऱ्याची विक्री सध्या शेतकरी करीत आहेत. बाजारात हरभऱ्याला सहा हजारांपासून साडे सहा हजारांपर्यंत दर मिळतो आहे. बाजारात प्रामुख्याने चांगला माल ६५०० रुपयांपर्यंत विकत आहे. गेल्या काही दिवसांतील आवक बघितली असता दीड हजार क्विंटलपेक्षा अधिक माल विक्रीसाठी येत होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT