Soybean Chlorosis : असा कमी करा सोयाबीन मधील पिवळेपणा

ज्या ठिकाणी सोयाबीनची पेरणी झालीय अशा ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे जमिनीतून अन्नद्रव्य न घेता आल्यामुळे सोयाबीन सुरवातीलाच म्हणजे रोपअवस्थेतच पिवळ- पांढर पडतयं.
Soybean Chlorosis
Soybean Chlorosis Agrowon
Published on
Updated on

Soybean Crop : यावर्षी बऱ्याच ठिकाणी वेळेवर पाऊस झाल्यामुळे सोयाबीनचीही वेळेवर पेरणी झालीय. पण बऱ्याच ठिकाणी मोजकाच पाऊस पडून त्यानंतर पावसाची उघडीप आहे.  अशा ठिकाणी अजून पेरण्याही झाल्या नाहीत. ज्या ठिकाणी सोयाबीनची पेरणी झालीय अशा ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे जमिनीतून अन्नद्रव्य न घेता आल्यामुळे सोयाबीन सुरवातीलाच म्हणजे रोपअवस्थेतच पिवळ- पांढर पडतयं. सोयाबीन अचानक पिवळ पडण्याची कारणे काय आहेत आणि यावर उपाय काय करयाचे याविषयीची माहिती घेऊया.

लोह म्हणजे फेरस या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये क्लोऱॉसीस ची लक्षणे निर्माण होतात. म्हणजे सोयाबीन पिवळ पडतं.  क्लोऱॉसीस ही सोयाबीन पिकातील एक शारीरिक विकृती आहे. क्लोरासीस विकृती जमिनीत लोहाची म्हणजे फेरसच्या कमतरतेमुळे होत नसून ती काही  कारणाने झाडांद्वारे लोह शोषण न केल्याने होते. यलो व्हेण मोझॅक या रोगामुळेही सोयाबीनची पाने पिवळी पडतात. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना रोगामुळे पिवळी पडणारी पाने आणि क्लोरॉसीस या विकृतीमुळे पिवळी पडणारी पाने यातील फरक ओळखता येत नाही. हा फरक कसा ओळखायचा तर  लोह म्हणजेच फेरस या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पहिल्यांदा  कोवळ्या पानांवर दिसून येते. हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि शिरा फक्त हिरव्या दिसतात. सोयाबीनची पहिल्यांदा ट्रायफोलिएट म्हणजे त्रिदल पाने हिरवी राहतात कारण लोह हे अन्नद्रव्य अचल म्हणजे वाहू न शकणारे आहे.  लोह रोपट्यात स्थिर होऊन साठविले जाते. म्हणूनच, नवीन पानांमध्ये लक्षणे दिसून येतात. पाने पिवळी पडल्यामुळे हरीतद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्र्लेषण क्रिया मंदावते आणि पिकाची वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येतं.

Soybean Chlorosis
Soybean Market Rate : सोयाबीन उत्पादकांनी असा काय गुन्हा केला?

कारणे

आता पाहुया क्लोरॉसीस होण्याची नेमकी कारणे काय आहेत?

लोहा ची कमतरता विशेष करुन कमी प्रमाणात निचरा होणाऱ्या चुनखडीयुक्त जमिनीत होते. वनस्पतींमध्ये हिरवे रंगद्रव्य-क्लोरोफिल तयार करण्यासाठी लोहाची गरज असते. बहुतेक जमिनीत वनस्पतींना लागणार्‍या गरजेपेक्षा  जास्त प्रमाणात लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य असते. तरिही बर्‍याचदा जमिनीचा सामू ७.५ पेक्षा जास्त असतो त्या जमिनीतील लोह फेरस या उपलब्ध स्थितीत न राहता फेरीक स्वरूपात जातो आणि तो पिकांना शोषून घेता येता नाही. त्यामुळे पिकावर लोहाची कमतरता दिसते. तसच जमिनीत मुळांना ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याने देखील मुळाद्वारे लोह कमी शोषलं जाऊन क्लोरॉसीस होतो.

उपाय

वेळेवर उपाय जर केले तर क्लोरॉसीसवर नियंत्रण मिळवता येतं त्यासाठी  

पिकाला जर पाण्याचा ताण पडला असेल तर आधी तुषार सिंचनाने संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था करावी. ज्या ठिकाणी पाऊस जास्त झालेला असेल अशा शेतात वाफसा येण्यासाठी जास्तीचे पाणी साचले असेल ते काढण्याची सोय करावी. वाफसा आल्यानंतर पीक ३०-३५ दिवसांचे होण्यापूर्वी एक कोळपणी करावी. ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-२ (II) ५० ग्रॅम किंवा ५० मिली अधिक १९:१९:१९ खत १०० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरज असेल तर नंतर ८-१० दिवसांनी पुन्हा  एकदा फवारणी करावी. अशा प्राकारे लक्षणे ओळखून पिवळया पडणाऱ्या सोयाबीनवर नियंत्रण मळवता येतं.

पिकाला जर पाण्याचा ताण पडला असेल तर आधी तुषार सिंचनाने संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था करावी. ज्या ठिकाणी पाऊस जास्त झालेला असेल अशा शेतात वाफसा येण्यासाठी जास्तीचे पाणी साचले असेल ते काढण्याची सोय करावी. वाफसा आल्यानंतर पीक ३०-३५ दिवसांचे होण्यापूर्वी एक कोळपणी करावी. ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-२ (II) ५० ग्रॅम किंवा ५० मिली अधिक १९:१९:१९ खत १०० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरज असेल तर नंतर ८-१० दिवसांनी पुन्हा  एकदा फवारणी करावी. अशा प्राकारे लक्षणे ओळखून पिवळया पडणाऱ्या सोयाबीनवर नियंत्रण मळवता येतं.

माहिती आणि संशोधन - कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी 

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com