Agriculture Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : कांद्यात काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, तूर, तसेच हरभऱ्याचे काय आहेत दर ?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, गवार आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कापसाच्या भावात चढ उतार दिसून आले. काही बाजारांमध्ये सरासरी भाव कमी तर काही बाजारांमध्ये वाढलेला दिसून आला. एकूणच देशभरातील सरसरी दरपातळी मात्र ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होती.

वायद्यांध्ये शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजार काहीसा कमी होऊन ८० सेंटवर बंद झाला. तर देशातील वायदे ५८ हजार २०० रुपयांवर होता. कापूस बाजारातील चढ उतार आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोयाबीन बाजाराचा विचार करता आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंड वाढले होते. सोयाबीनचे वायदे १२.४९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते.

तर सोयापेंडने पुन्हा एकदा ३८७ डाॅलर प्रतिटनांचा टप्पा गाठला. देशातली बाजारात मात्र भाव कायम होते. सोयाबीनचा बाजार ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपये होता. सोयाबीनच्या बाजारात चढ उतार राहतील, असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कांद्याच्या बाजारात मागील दोन दिवसांपासून काहीशी सुधारणा दिसून आली. बहुतांशी बाजारांमध्ये कांद्याचे भाव क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांनी सुधारले होते. बाजारातील कमी झालेली आवक आणि मागणी टिकून असल्यामुळे दरात काहीशी सुधारणा झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.

कांदा आज १४०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला गेला. कांदा बाजारातील आवक पुढील काही दिवसांनंतर आणखी कमी होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सांगत आहेत. 

बाजारात गवारची आवक कमी झाली आहे. तर दुसरीकडे गवारचा उठाव चांगला आहे. त्यामुळे गवारचे भाव टिकून आहेत. गवारच्या उन्हाळी लागडीसाठी अनेक भागात पाण्याची टंचाई होती. आजही पिकाला बहुतांसी ठिकाणी पाणी कमी पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

त्याचा परिणाम गवारच्या बाजारातील आवकेवर होत आहे. त्यामुळे गवारचा भाव ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. गवारचा भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

ज्वारीचे भाव मागील दोन महिन्यांपासून नरमलेले आहेत. रब्बीची ज्वारी बाजारात आल्यानंतर आवक वाढून ज्वारीच्या भावावर दबाव आला होता. ज्वारीचा पेरा काहीसा वाढल्याने उत्पादन वाढल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर उत्पादकता कमी राहील्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पण बाजारातील आवक वाढल्याने २ हजार ३०० ते ३ हजारांचा भाव मिळत आहे. हा भाव व्हरायटीप्रमाणे आणि गुणवत्तेप्रमाणे मिळत आहे. ज्वारीवरीचे सध्याचे भाव आणखी काही दिवस राहू शकतात. त्यानंतर दरात सुधारणा अपेक्षित आहे, असे अभ्यासकांनी सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला उद्योग, कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

Sugarcane FRP: सोलापूर जिल्ह्यात थकली ६४२ कोटींची एफआरपी

Shekru Sighting: वाईत दुर्मिळ शेकरूचे दर्शन

Onion Seed Production: कांद्याच्या बीजोत्पादनाकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Union Budget 2026: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT