Bedana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Solapur Bedana Market : सोलापूर बाजार समितीत पाचशे टन बेदाण्याची आवक

Raisin Market : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाण्याच्या आवकीत वाढ सुरूच आहे. चालू आठवड्यात ५०० टन इतका बेदाणा विक्रीसाठी दाखल झाला होता.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाण्याच्या आवकीत वाढ सुरूच आहे. चालू आठवड्यात ५०० टन इतका बेदाणा विक्रीसाठी दाखल झाला होता. यामध्ये प्रति किलो ४०१ रुपये इतका कमाल दर मिळाला. कमी दर्जाच्या बेदाण्यालाही प्रति किलो दीडशे रुपये इतका दर राहिला.

सहा वर्षांच्या खडतर कालावधीनंतर द्राक्ष उत्पादकांना समाधानाचे दिवस आल्याचे दिसत आहे. सध्या बेदाणा बाजार तेजीत असून हंगामाच्या सुरुवातीपासूनच दरामध्ये तेजी दिसून येत आहे.

गुरुवारी बाजार समितीमध्ये झालेल्या विक्रीमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी सोमनाथ माळी यांच्या ४८ बॉक्स बेदाण्याला सर्वांत जास्त भाव मिळाला. बेदाण्याच्या दरामध्ये गत आठवड्याच्या तुलनेने चालू आठवड्यात प्रति किलो ५० रुपये इतकी वाढ दिसून आली आहे.

घटलेले द्राक्ष उत्पादनातील क्षेत्र, त्याचबरोबर वांज द्राक्ष बागांचे वाढलेले प्रमाण यामुळे यावर्षी बेदाणा उत्पादन घटले आहे. याउलट देशांतर्गत बाजारामध्ये बेदाण्याला चांगली मागणी आहे.

बेदाणा दराची स्थिती

चालू आठवड्यातील आवक : ५०० टन

कमाल दर : ४०१ रुपये प्रति किलो

किमान दर : १५० रुपये प्रति किलो

गत आठवड्यात

एकूण आवक : ५०० टन

कमाल दर : ३५० रुपये प्रति किलो

किमान दर : १३० रुपये प्रति किलो

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT