Banana Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Market : केळी दरात काहीशी नरमाई

खानदेशात केळी दरात काहीशी नरमाई मागील सहा ते सात दिवसांपासून दिसत आहे. खोडवा किंवा पिलबाग केळीत काढणी बऱ्यापैकी होत आहे.

Team Agrowon

Banana Market जळगाव ः खानदेशात केळी दरात (Banana Rate) काहीशी नरमाई मागील सहा ते सात दिवसांपासून दिसत आहे. खोडवा किंवा पिलबाग केळीत काढणी (Banana Harvesting) बऱ्यापैकी होत आहे. सध्या केळीस कमाल २५०० तर किमान १७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. निर्यातीची (Banana Export) किंवा दर्जेदार केळीची आवक कमी आहे.

केळीची परदेशातील निर्यात अद्यापही प्रतिदिन चार कंटेनर, (एक कंटेनर २० टन क्षमता) अशीच आहे. जळगाव जिल्ह्यात दोन, धुळ्यात एक व नंदुरबारात एक कंटेनर निर्यातीच्या केळीसंबंधी उपलब्ध होत आहे. स्थानिक बाजारात केळीची मागणी कमी आहे. पण केळीची आवकही कमी असल्याने दरात मोठी घसरण किंवा दबाव नाही.

परंतु केळीचे कमाल दर २६०० ते २८०० रुपयांवरून २५०० रुपये प्रतिक्विंटल, असे झाले आहेत. तर किमान दर २००० रुपयांवरून १९००, १८०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. निर्यातीच्या केळीची काढणी रखडत सुरू आहे. उष्णता वाढली आहे. परंतु विषम वातावरण कायम आहे. वातावरणातील उष्णता, कोरडे वातावरण व निरभ्र स्थिती याची अपेक्षा आहे.

सध्या खानदेशात प्रतिदिन ७० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. एवढीच आवक मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर व लगत होत आहे. तेथेही कमाल दर २५०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. उत्तर भारतात केळीची मागणी आहे.

तेथील काही खरेदीदार जळगाव, धुळे जिल्ह्यातील एजंटकडे मागणी नोंदवीत आहेत. परंतु केळीची हवी तेवढी काढणी, आवक सुरू नसल्याने संबंधित मंडळी पुरवठा करू शकत नसल्याचे दिसत आहे.

सध्या मुक्ताईनगर, यावल, रावेर, चोपडा व धुळ्यातील शिरपूर भागात पिलबाग केळीमधून आवक होत आहे. नंदुरबारात शहादा, तळोदा भागात काही आगाप नवती बागांमधून केळीची काढणी सुरू आहे. या केळी उत्पादकांना चांगले दर निर्यातीसंबंधी मिळत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विर्दभात पावसाचा जोर वाढणार; मराठवाड्यात काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज

Microbial Soil Management: अन्नद्रव्य व्यवस्थापनात सूक्ष्मजीव महत्त्वाचे

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT