Raisin Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Raisin Market : बेदाण्याच्या दरात किचिंत वाढ

Market Update : शून्य पेमेंटसाठी १७ ऑक्टोबरपासून ते १६ नोव्हेंबरपर्यंत सौदे बंद ठेवले जाणार असल्याची माहिती बेदाणा व्यापाऱ्यांनी दिली.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : गेल्या महिन्यापूर्वी बेदाण्याच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली होती. दिवाळीनिमित्त बेदाण्याची मागणी वाढली असून उठावही होत आहे. त्यामुळे बेदाण्याच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ झाली आहे. बेदाण्याचे दर टिकून आहेत. शून्य पेमेंटसाठी १७ ऑक्टोबरपासून ते १६ नोव्हेंबरपर्यंत सौदे बंद ठेवले जाणार असल्याची माहिती बेदाणा व्यापाऱ्यांनी दिली.

दसरा सणानिमित्त बेदाण्याची मागणी वाढल्याने या दरम्यान, बेदाण्यात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर बेदाण्याचे दर टिकून होते. गेल्या आठवड्यापासून देशभरात दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर बेदाणा खरेदीची लगबग वाढली आहे. बाजारात बेदाण्याचा उठाव होत आहे. त्यामुळे गेल्या सप्ताहापासून बेदाण्याच्या दरात पुन्हा प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली आहे. सांगली बाजार समितीत दर बुधवारी, शुक्रवारी, तासगाव बाजार समितीत दर सोमवारी, गुरुवारी, शनिवारी आणि पंढरपूर बाजार समितीत दर मंगळवारी बेदाण्याचे सौदे होतात.

सध्या सांगली बाजार समितीत प्रत्येक बेदाणा सौद्याला ५०० ते ६००, तासगाव बाजार समितीत ७०० ते १००० आणि पंढरपूर १००० टनाची आवक होत आहे. त्यापैकी ६० ते ७० टक्के बेदाणा विक्री होत आहे. गेल्या आठवड्यापासून हिरवा बेदाणा प्रतिकिलो १०० ते २१० रुपये, पिवळा बेदाणा १०० ते १९० रुपये, तर काळा बेदाणा ३० ते १०० रुपये असा दर मिळत आहे. बाजारात आणखी नऊ दिवस बेदाणा विक्री होणार आहे. गेल्या दीड महिन्यापासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. यंदा बेदाण्याच्या दरात फारशी तेजी-मंदी झाली नाही. परंतु बेदाण्याचे दर टिकून असले तरी, बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

शून्य पेमेंटसाठी सौदे महिनाभर बंद

दरवर्षी बेदाणा बाजारपेठेतेली व्यापारी आणि शेतकऱ्यांचे सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण होईपर्यंत सांगली, तासगाव, पंढरपूर बाजार समितीतील बेदाण्याचे सौदे एक महिना पूर्ण बंद ठेवले जातात. या दरम्यान, आर्थिक व्यवहार पूर्ण केले जातात. याची माहिती बाजार समितीकडे दिली जाते. यावर्षीही शून्य पेमेंटसाठी १७ ऑक्टोबरपासून ते १६ नोव्हेंबरपर्यंत बेदाण्याचे सौदे बंद ठेवले जाणार असल्याची माहिती बेदाणा व्यापाऱ्यांनी दिली.

दसरा, दिवाळी या सणामुळे बेदाण्याची मागणी चांगली आहे. त्यामुळे बाजार समितीत बेदाण्याची आवकही चांगली असून उठावही होत आहे. त्यामुळे बेदाण्याचे दर टिकून आहेत.
सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT